मानवी उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर मानवी शरिरात शेकडो बदल होत गेले आहेत. आता असेच काही बदल पुढच्या 100 वर्षांत मानवी शरिरात होणार अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. अपघात, बदलती जीवनशैली यामुळे थेट मानवी शरिरावर परिणाम होत असतो. त्यातूनच माणसाच्या शरिरात नवीन बदल घडून येतील, असा हा अभ्यास सांगतो. शेफील्ड आणि हार्वर्ड विद्यापीठाने पुढच्या काही वर्षात मानवी शरिरात होणा-या संभाव्य बदलांचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, काही महत्त्वाची समोर आली आहे.
( हेही वाचा: संगीत उपचार कसे करतात, जाणून घेण्यासाठी मोफत शिबीर )
‘असा’ दिसेल भविष्यातील माणूस
माणसाचे दात चोचीसारखे होतील. माणसांची उंची वाढेल, सरासरी उंची 5.10 फूट होईल, एखाद्या बास्केटबाॅल खेळाडूसारखा दिसेल. फुफ्फुसे मजबूत होतील, जास्त ऑक्सिजन खेचू शकतील. टायपिंग आणि टचस्क्रिनसारखी यंत्र वापरुन मानवी बोटे लांबसडक होतील. माणूस तुलनेने अधिक जाड दिसायला लागेल, असेही अहवालातून समोर आले आहे.
सरडा जसा रंग बदलतो तसा माणसाच्या मुडप्रमाणे त्वचेचा रंग बदलला जाईल. माणूस अधिक तरुण दिसायला लागेल. 50 वर्षांचा माणूस 30 वर्षांचा दिसेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता जिवंत ठेवली जाईल, असेही भाकित वर्तवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community