-
ऋजुता लुकतुके
शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांच्या भेट देण्याच्या जागांच्या यादीत हल्ली एक नाव हमखास असतं ते म्हणजे येथील साईतीर्थ डिव्होशनल पार्क आणि वॉटर पार्क. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या थीम पार्कचा ताबा इमॅजिकामॅजिकवर्ल्डच्या मालपानी कुटुंबीयांकडे गेला आहे. त्यानंतर या थीम पार्कचा आणखी विकास झाला आहे. देशातील डिव्होशनल किंवा धार्मिक, आध्यात्मिक संकल्पनेवर आधारित हे पहिलं थीम पार्क आहे. (Shirdi Water Park)
(हेही वाचा- Ravindra Jadeja Net Worth : ‘सर जडेजा’ आहे इतक्या कोटींचा मालक )
साई मंदिरापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे तिथे पोहोचणंही सोपं आहे. थीम पार्कमध्ये प्रवेश करताच साई बाबांची एक विशाल प्रतिमा आपल्याला दिसते. आणि ती रुबिक क्यूब वापरून केली आहे. शिवाय आत एक विशाल थिएटरही आहे. लेझर शो आणि रोबोटिक शो यांचं आकर्षणही लोकांना असतं. थिएटरमध्ये एक तासाची साई बाबांच्या चमत्कारांवर आधारित एक फिल्मही तुम्हाला दाखवली जाते. साईभक्तीबरोबरच करमणुकीचीही सोय असल्यामुळे शिर्डीत आलेल्या लोकांचा एक दिवस इथं मजेत जातो. (Shirdi Water Park)
साईबाबांच्या आयुष्यातील चार महत्त्वाच्या गोष्टी इथे आहेत. ते जेवण बनवत ती जागा म्हणजे ‘किचन ऑफ कम्पॅशन,’ ते राहत असत ती कुटी आणि त्यांच्या भोवती तेवत असलेली मशाल तसंच ते काम करत असलेली गिरण. या चारही गोष्टी पाहण्यासाठी लोकांची इथं अमाप गर्दी होते. शिवाय साईबाबांच्या जन्मापासून ते अखेरच्या दिवसांपर्यंत त्यांचा प्रवास दाखवणारी एक चित्रफित इथं दाखवण्यात येते. (Shirdi Water Park)
(हेही वाचा- Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त)
शिवाय या जागेत देशभरातील धार्मिक स्थळांचं दर्शनही तुम्हाला घडवलं जातं. प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर, जगन्नाथ मंदिर अशा १० देवळांच्या प्रतिकृती इथे आहेत. इथल्या थिएटरमध्ये लंका – दहन हा आधुनिक तंत्राने बनलेला एक शोही सादर केला जातो. वॉटर पार्क बरोबरच हा धार्मिक अनुभव घेण्यासाठी तीन तास पुरेसे आहेत. शिवाय तुम्हाला विविध प्रकारचे स्नॅक्सही आत मिळतात. त्यामुळे तुमची जेवणा – खाण्याची सोयही होते. (Shirdi Water Park)
सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आठवड्याचे सातही दिवस हे साई तीर्थ पार्क सुरू असतं. त्यासाठी प्रवेश शुल्क आहे ४४९ रुपये. (Shirdi Water Park)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community