shivaji park dadar : शिवाजी पार्क कोणत्या कारणासाठी आहे प्रसिद्ध?

37
shivaji park dadar : शिवाजी पार्क कोणत्या कारणासाठी आहे प्रसिद्ध?

शिवाजी पार्क रेसिडेन्शिअल झोन हा १८७ रेसिडेंशियल इमारतींचा समावेश असलेला परिसर आहे. या सर्व इमारती शिवाजी पार्क योजनेचा भाग म्हणून दादर, मुंबई येथे बांधल्या गेल्या आहेत. या भागातील बहुतांश इमारती १९०० सालच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बांधण्यात आल्या होत्या. (shivaji park dadar)

शिवाजी पार्क हे मुंबईतलं एक अपस्केल रिअल इस्टेट क्लस्टर मानलं जातं. या परिसरात माधव मनोहर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक प्रमुख मराठी व्यक्ती वास्तव्य करायच्या. शिवाजी पार्कच्या परिसरात राहणं हे प्रतिष्ठित मानलं जातं. (shivaji park dadar)

(हेही वाचा – सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी; Pradhanmantri Sangrahalaya ने पाठवले पत्र)

इतिहासातलं शिवाजी पार्क

१९३७ सालापर्यंत शिवाजी पार्क मैदान आणि शिवाजी पार्क रेसिडेंश क्षेत्रासोबतच आसपासचा परिसर विकसित करण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या राजकीय घडामोडींसाठी शिवाजी पार्क मैदान हा एक महत्त्वाचा टप्पा झाला होता. याच शिवाजी पार्कच्या मैदानात मुंबईचा राजकीय इतिहास उलगडला. (shivaji park dadar)

भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर इतर अनेक राजकीय कार्यक्रम जसं की, शिवसेनेची स्थापना आणि इतर महत्त्वाच्या राजकीय रॅली शिवाजी पार्कच्या मैदानावर किंवा त्याच्या आसपास आयोजित केल्या गेल्या होत्या. (shivaji park dadar)

दिवंगत अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या कित्येक क्रिकेट प्रशिक्षकांनी इथलं मैदान गाजवलं असल्यामुळे शिवाजी पार्क मैदानाला भारतीय क्रिकेटचं माहेर म्हणून ओळखलं जातं. यांसारख्या अकादमीतुन भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तयार केले गेले. त्यामध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, प्रवीण अमरे, यांसारख्या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. संदीप पाटील, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर, अमित पागनीस हे सुद्धा शिवाजी पार्क मध्ये खेळुनच मोठे झाले. (shivaji park dadar)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : रोहित शर्माच्या नकारात्मक नेतृत्वावर रवी शास्त्री यांची टीका)

वर्तमानातलं शिवाजी पार्क

आज शिवाजी पार्क रेसिडेंशलं झोन हे उच्च मध्यमवर्गीय निवासी एन्क्लेव्ह बनलं आहे. या झोनमध्ये सात मजल्यापासून ते तेवीस मजल्यापर्यंतचे बहुमजली टॉवर्स तयार करण्यासाठी अनेक पूर्व-वसाहतपूर्व इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. (shivaji park dadar)

पुनर्विकसित इमारतींमध्ये चाणक्य, अश्वमेध, बिल्डार्च टॉवर, अथर्व, साकेत, शिवनेरी हाइट्स, रॉयल एकॉर्ड, श्री अपार्टमेंट्स, संकल्प आणि मातोश्री हाइट्स यांचा समावेश आहे. इथल्या उंच इमारतींमधून अरबी समुद्र आणि शिवाजी पार्कचं अप्रतिम दृश्य दिसतं. (shivaji park dadar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.