शिवनेरी किल्ला (shivneri fort) हा महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या जुन्नर येथे असलेला एक प्राचीन किल्ला आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता.
(हेही वाचा – constable salary : भारतात constable ला किती असतो पगार?)
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास
शिवनेरी किल्ल्याचा (shivneri fort) उपयोग कल्याण या शहराकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी केला जायचा. १५व्या शतकामध्ये दिल्ली इथलं तख्त हादरल्यानंतर हा शिवनेरी किल्ला बहमनीकडे गेला आणि त्यानंतर १६व्या शतकात अहमदनगरच्या ताब्यात गेला. १५९५ साली शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार मालोजी भोसले यांना निजाम शहाने अहमदनगरची सत्ता दिली. त्यांना शिवनेरी किल्ला आणि चाकण भेट दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचं बालपणही याच किल्ल्यावर गेलं. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं एक लहान मंदिर आहे. शिवाई देवीच्या नावावरूनच महाराजांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं.
१६७३ साली इंग्रज फ्रेज याने किल्ल्याला भेट दिली होती. त्याला तो किल्ला अजिंक्य वाटला. त्याने केलेल्या नोंदीनुसार शिवनेरी किल्ल्यामध्ये सात वर्षं एक हजार कुटुंबांची पोटं भरण्यासाठी पुरेसा धान्याचा साठा होता. १८१९ साली तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर हा किल्ला (shivneri fort) ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
(हेही वाचा – Double Hat – Trick in T20 : अर्जेंटिनाच्या फेनेलची टी-२० क्रिकेटमध्ये दुहेरी हॅट ट्रिक)
शिवनेरी किल्ल्याचं आर्किटेक्चर
शिवनेरी किल्ला (shivneri fort) हा त्रिकोणी आकाराचा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचं प्रवेशद्वार टेकडीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला आहे. मुख्य दरवाज्याव्यतिरिक्त या किल्ल्यावर आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराला स्थानिक भाषेध्ये साखळी दरवाजा असं म्हणतात. किल्ल्याच्या या दरवाज्यापर्यंत चढण्यासाठी साखळदंड पकडून ठेवावे लागतात. शिवनेरी किल्ल्याच्या १ मैलापर्यंत सात नागमोडी आकाराचे सु-संरक्षित दरवाजे आहेत.
किल्ल्याभोवती तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत जिथे फाशीची शिक्षा दिली जात असे तिथे एक ओव्हरहँगिंग आहे. या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी तटबंदीला अनेक दरवाजे आहेत. त्यांपैकीच एक महादरवाजा हा आहे.
शिवनेरी किल्ल्याच्या (shivneri fort) मध्यभागी एक पाण्याचं तळं आहे. त्याला ‘बदामी तलाव’ असं म्हणतात. या तलावाच्या दक्षिणेला जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत. किल्ल्यामध्ये गंगा आणि यमुना नावाचे दोन पाण्याचे झरे आहेत. हे झरे वर्षभर वाहत असतात. या किल्ल्यापासून दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर लेण्याद्री लेणी आहेत. अष्टविनायक मंदिरांपैकी एक मंदिर इथेच आहे. हे ठिकाण संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : जोश हेझलवूडच्या दुखापतीचा भारताला दिलासा)
शिवनेरी किल्ल्यावर कसं जायचं?
शिवनेरी किल्ल्यापासून (shivneri fort) सर्वांत जवळ जुन्नर हा तालुका आहे. जुन्नरपासून साधारणपणे २ ते ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने गडमाथ्यावर जाणं सोपं आहे.
गिर्यारोहणाची आवड असणारे पर्यटक किंवा ट्रेकर्स योग्य साधनांचा वापर करून किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या साखळी दरवाज्याने किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. शिवनेरी गडाच्या माथ्यावरून नारायणगड, हडसर, चावंड आणि निमगिरी किल्ले सहज दिसतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community