सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सवात ‘शोभायात्रा’

97

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने १७ मे ते २० मे या कालावधीत कुडाळ एस.टी.डेपो या ठिकाणी कृषि, पशुपक्षी व पर्यटन महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये विविध शेती विषयक चर्चासत्रे, शास्त्रज्ञ परिसंवाद, कृषिविषयक प्रात्यक्षिके इत्यादीचे आयोजन करणेत आलेले आहे. तसेच सदर महोत्सवामध्ये विविध कृषि उत्पादने, सुधारीत शेती औजारे, आंबा, काजू, फणस, याबरोबरच खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची मेजवानी असलेले स्टॉल असणार आहेत. १८ मे रोजी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने काढण्यात येणारी ‘शोभायात्रा’ या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

( हेही वाचा : माथेरानमध्ये धावणार मिनी बस! )

शोभायात्रेचे आयोजन

बुधवारी १८ मे रोजी ८.३० वाजता कुडाळ पंचायत समितीच्या ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे ९७ होणार आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या ३५ बैलगाड्या, २४ प्रकारचे प्रदर्शनीय वळू, घोडी, बदके, ससे, कोंबडी, कबुतरे, प्रदर्शनीय शेळ्या-बोकड, वेगवेगळ्या जातींचे प्रदर्शनीय कुत्रे, चलचित्र रथ सहभागी होणार आहेत. याबरोबरच कुडाळ पंचायत समितीच्या अंगणवाडी सेविकाचा पोषण पालखी चित्ररथ, महिलांचा नऊवारी वेशभूषेतील पोषण टोपल्या चित्ररथ, लेझीम पथक व मोटारसायकल रॅलीचा सहभाग असेल.

अशा या भव्यदिव्य शोभायात्रेत अंदाजे एक हजार शेतकरी, पशुपालक, अधिकारी, कर्मचारी व अंदाजे १५० विविध प्रकारची जनावरे सहभागी होणार आहेत. या भशोभायात्रेचा सर्व सिंधुदुर्गवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.