ख्रिसमसला स्ट्रॉबेरीचा तुटवडा!

117

डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नाताळ सणासाठी विविध पदार्थ, मिठाई बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान स्ट्रॉबेरीला बहर येत असतो. यंदाच्या वर्षी मात्र अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्ट्रॉबेरीचे रोप हे नाजूक असते अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीची पूर्णपणे नासाडी झाली. जरी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक झाली असली तरी, तुलनेने यावर्षी स्ट्रॉबेरीचा बाजारात तुटवडा आहे.

स्ट्रॉबेरीचा तुटवडा

महाबळेश्वर, वाई, पाचगणी या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रोपांची नासाडी होऊन, रोपे मुळापासून कुजली, त्यांना बुरशीजन्य रोगांची लागण झाली. यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनात घट झाली आहे. यापुढील काळात स्ट्रॉबेरीसाठी पोषक हवामान राहिले तरच उत्पादनात पुन्हा एकदा वाढ होईल. असे स्थानिक शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : सॅनिटरी नॅपकिनला मेंस्ट्रुअल कपचा पर्याय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत )

ख्रिसमसला स्ट्रॉबेरीची मागणी

स्ट्रॉबेरीला ख्रिसमस सणाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ख्रिसमसला विविध शेक, चॉकलेट, मिठाई या सर्व पदार्थांमध्ये स्ट्रॉबेरीचा वापर होतो. मुख्य बाजारात स्ट्रॉबेरीची आवक कमी होताना दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्ष स्वागताला आणि ख्रिसमस सणाला स्ट्रॉबेरीचा तुटवडा भासणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.