घरं खरेदी करावे की भाड्याने राहावे? समजून घ्या कशात होईल नफा

120

आपले स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते, भले मग घर कर्ज काढून का घेणे होईना, भाड्यामध्ये जेवढे पैसे जातात, त्यात थोडेस आणखी पैसे टाकल्यास घरासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता निघून जातो, असा युक्तीवाद त्यासाठी केला जातो. काही लोकांना मात्र असे वाटते की, घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिलेले फायदेशीर आहे. घरभाडे हे ईएमआयपेक्षा कमीच असते. उरलेले पैसे गुंतवून मोठा परतावा मिळू शकतो. हा तिढा सोडवण्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स समजून घेऊ या.

घर खरेदीचा हिशोब

समजा, तुम्ही 50 लाखांचे घर खरेदी केले. 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केले आणि 40 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षे मुदतीसाठी घेतले. 9 टक्के व्याज दराने तुमचा मासिक हप्ता 36 हजार रुपये होईल. तुम्ही 20 टक्के कर ब्रॅकेटमध्ये असाल तर सवलतीसह तुमचा प्रत्यक्षातील हप्ता 7.2 टक्के व्याज दराने 31 हजार 500 रुपये होईल. त्यानुसार, 20 वर्षात तुमचे 36 लाख रुपये व्याजात जातील. 20 वर्षात एकूण 86 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. वार्षिक 7 ते 8 टक्के दराने घराच्या किमती वाढल्यास 20 वर्षांनी घराची किंमती 1.90 कोटी रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला 1.04 कोटींचा लाभ होईल.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडले, पण आमदारकीचा राजीनामा अद्याप खिशातच! )

भाड्याच्या घराचा हिशोब

15 हजार रुपयांचे भाडे असलेले घर तुम्ही 20 वर्षांसाठी वापरले असेल. तर कर सवलतीत एचआरएचा लाभ मिळेल. तुम्ही 20 टक्क्यांच्या ब्रॅकेटमध्ये असाल, तर कर सवलत धरुन तुम्हाला प्रत्यक्षातील भाडे 12 हजारच पडेल. भाडे वार्षिक 8 टक्के दराने वाढले तर 20 वर्षांत तुम्हाला 66 लाख भाडे द्यावे लागेल. शिवाय तुमचे डाऊन पेमेंटचे 10 लाख रुपये वाचलेले आहेत. त्यावर 10 ते 12 टक्के परतावा कमावू शकता. 20 वर्षात 10 लाखांचे 67 लाख रुपये होतील. दर महिन्याला 36 हजारांऐवजी 12 हजारांचा ईएमआय तुम्हाला द्यावा लागेल, म्हणजेच दर महिन्याला 24 हजार रुपये वाचतील. त्यावर 10 टक्के परतावा मिळाल्यास 20 वर्षांत तुमच्याकडे 15 कोटी रुपये असतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.