आज दुसरा श्रावणी सोमवार. शिवपूजेला या महिन्यात विशेष महत्त्व आहे. दर सोमवारी शंकराला तांदूळ, तीळ, मूग, जवस अशा विविध धान्याचा अभिषेक केला जातो. त्याची विधीवत पूजा केली जाते. या दिवसांतलं वाखाणण्याजोगं आणि पारंपरिक वैशिष्ट्य म्हणजे उपवासाच्या दिवशी शिव आणि विष्णूच्या पूजेबरोबरच त्यांच्या कथा वाचण्याची आणि श्रवण करण्याची परंपरा आहे. बऱ्याचशा महिला या दिवसांत श्रावणी सोमवारची कहाणी, शिवामुठीची कहाणी, श्रावण सोमवार व्रत कथा, शुक्रवारी देवीची कथा यांचे वाचन करतात. श्रीविष्णुंप्रमाणेच शिवानेही अनेक अवतार घेतले आहेत. शिवपुराणात त्याने घेतलेल्या विविध अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत. पिप्पलदा, नंदी, भैरव, अश्वत्थामा, शरभ, ऋषी दुर्वासा, हनुमान, वृषभ, यतिनाथ, किरात…अशी शंकराच्या काही अवतारांची नावे पुराण कथांमध्ये वाचायला मिळतात. जाणून घेऊया महादेवाने घेतलेल्या या दिव्य आणि अलौकिक अवतारांचं महत्त्व –
शरभ अवतार
हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूला मारूनही भगवान नृसिंह शांत होत नव्हते. त्यानंतर भगवान शिव शरभ म्हणून अवतरले.भगवान शिव अर्धे हरीण आणि अर्धे पक्षी शरभच्या रूपात प्रकट झाले. रभ हा आठ पाय असलेला प्राणी होता,जो सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता.शरभजींनी भगवान नृसिंहाला शांत होण्यासाठी प्रार्थना केली होती,पण ते शांत झाले नाहीत. या रूपात ते भगवान नृसिंहाजवळ पोहोचले आणि त्यांची स्तुती केली,परंतु नृसिंहाचा राग शांत झाला नाही.त्यानंतर शरभ देवांनी नृसिंहाना आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले. यानंतर नृसिंह शांत झाले आणि त्यांनी शरभावताराची माफी मागितली.
(हेही वाचा –Plastic Ban : प्लास्टिक बंदी नाटकाचा प्रयोग पुन्हा सुरू!)
नंदी अवतार
शिलाद मुनी ब्रह्मचारी ऋषी होते. त्यांनी लग्न केले नव्हते. एके दिवशी त्यांच्या पूर्वजांनी शिलादला मुलाला जन्म देण्यास सांगितले.जेणेकरून त्याचा वंश चालू राहील. यानंतर शिलादांनी अपत्य प्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या केली.तेव्हा शिवजींनी स्वतः शिलाद यांच्या घरी पुत्ररूपात जन्म घेण्याचे वरदान दिले.काही काळाने नांगरणी करत असताना शिलाद मुनींना जमिनीत एक मूल दिसले.शिलाद यांनी त्याचे नाव नंदी ठेवले. शिवजींनी नंदीला गणाध्यक्ष बनवले.अशाप्रकारे नंदी नंदीश्वर झाला.
भैरव देव
शिवपुराणानुसार भैरव देव हे शिवाचे रूप आहे. एकदा ब्रह्माजी आणि विष्णूजी स्वतःला सर्वश्रेष्ठ असण्याबद्दल वाद घालत होते. तेव्हा तेजपुंजमधून शिवजी एका व्यक्तीच्या रूपात प्रकट झाले. त्यावेळी ब्रह्माजी म्हणाले की तू माझा मुलगा आहेस. हे ऐकून शिवजी संतापले. तेव्हा शिवजींनी त्या व्यक्तीला सांगितले की, कालप्रमाणे दिसल्यामुळे तू कालराज आहेस आणि उग्र असल्यामुळे तू भैरव आहेस. कालभैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले होते. यानंतर काशीमध्ये कालभैरव ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले.
अश्वत्थामा
महाभारताच्या वेळी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो. द्रोणाचार्यांनी भगवान शंकरांना पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली. भगवान शिवाने त्यांना वरदान दिले होते की, ते आपला पुत्र म्हणून अवतार घेतील. श्रीकृष्णाने अश्वत्थामाला कपाळावरील रत्न काढून कलियुगाच्या शेवटपर्यंत भटकत राहण्याचा शाप दिला होता.
वीरभद्र
जेव्हा सतीने तिचे वडील दक्षाच्या ठिकाणी यज्ञात उडी मारून आपल्या देहाचा त्याग केला तेव्हा शिव खूप क्रोधित झाले.त्यावेळी भगवान शिवाने वीरभद्राला आपल्या केसातून प्रकट केले.वीरभद्राने दक्षाचे शीर कापले होते. नंतर देवतांच्या प्रार्थनेनुसार भगवान शिवाने बकरीचे तोंड त्यांच्या धडावर ठेवून दक्षाचे पुनरुज्जीवन केले.
दुर्वासा मुनी
अनसूया आणि त्यांचे पती महर्षी अत्री यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली.तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णू आणि शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले.तेव्हा तिन्ही देवांनी सांगितले होते की, आमच्या अंशाने तुला तीन पुत्र होतील. यानंतर ब्रह्माजींच्या अंशातून चंद्र, विष्णूजींच्या अंशातून दत्तात्रेय आणि शिवजींच्या अंशातून दुर्वासा मुनींचा जन्म झाला.
हनुमान
श्रीरामाचे परम भक्त हनुमानजी यांना शिवाचा अवतार मानले जाते.हनुमानजी देवी सीतेच्या वरदानामुळे अमर आहेत, याचा अर्थ हनुमानजी कधीही वृद्ध होणार नाहीत आणि अमर राहतील.
किरात अवतार
महाभारतात अर्जुन महादेवांकडून दैवी शस्त्र मिळविण्यासाठी तपश्चर्या करत होता.त्यावेळी अर्जुनाला मारण्यासाठी वराहाच्या रूपात एक असुर आला होता.अर्जुनाने वराहावर बाण सोडला. त्याच वेळी एक किरात वनवासीने वराहला बाण मारला.दोघांचे बाण एकत्र वराहावर पडले. यानंतर त्या वराहाचा ताबा मिळविण्यासाठी अर्जुन आणि किरात यांच्यात युद्ध झाले. युद्धात अर्जुनाचे शौर्य पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला दैवी शस्त्र दिले.
अर्धनारीश्वर
शिवपुराणानुसार, ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले होते;परंतु विश्व पुढे सरकत नव्हते. म्हणूनच ब्रह्माजींसमोर आवाज आला की त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करावी.यानंतर ब्रह्माजींनी शिवजींना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली.भगवान शिव अर्धनारीश्वराच्या रूपात प्रकट झाले. शिवजींनी शक्ती म्हणजेच देवीला आपल्या शरीरापासून वेगळे केले आणि तेव्हापासून सृष्टी पुढे जाऊ लागली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community