हिंदुधर्मात रुद्राक्ष पवित्र आणि प्रभावी मानले गेले आहे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तिला सौभाग्य प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. एकमुखी, पंचमुखी, गौरीशंकर, पंधरामुखी रुद्राक्ष…असे रुद्राक्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये गौरीशंकर रुद्राक्ष सर्वात शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात रुद्राक्ष धारण करण्यामागे जसे आध्यात्मिक फायदे आहेत तसेच आरोग्यदायी फायदेही सांगण्यात आले आहेत.
धार्मिक कारणाकरिता वापरले जाणारे रुद्राक्ष शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे. रुद्राक्ष धारण केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. यामुळे आरोग्य सुधारून रोगांशी लढण्यासाठी बळ मिळते. यामुळे रक्तातील अशुद्धता दूर व्हायलाही मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
(हेही वाचा – Conjunctivitis Patient : राज्यात डोळ्यांच्या साथीमुळे रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत)
डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही रुद्राक्ष धारण केल्याने फायदा होऊ शकतो.
रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते. यामुळे व्यक्तिमत्त्व शांत आणि आकर्षक बनते. जपासाठी रुद्राक्षाचे मणी वापरले, तर नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. रुद्राक्षाच्या बियांही आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत.
प्राचीन काळापासून आध्यात्मिक शक्ती, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी रुद्राक्ष धारण करण्याची प्रथा आहे. रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मकतेचा प्रभाव दूर होतो.
व्यक्तीची चिंता आणि मानसिक तणाव दूर होतो. रक्तदाबही सामान्य राहतो याशिवाय व्यक्ती अनेक आजारांपासून सुरक्षित राहते.
मूत्राशयाचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे, श्वसन आणि हृदयाचे आजार, यकृत आणि स्तनाच्या समस्या दूर होण्याकरिताही रुद्राक्ष वापरल्याने फायदा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community