छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय हे मुंबई इथे असलेलं एक संग्रहालय आहे. या संग्रहालयात भारताच्या प्रागैतिहासिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या इतिहासाचे सगळ्या प्रकारचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात.
२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या वास्तु संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती. हे संग्रहालय दक्षिण मुंबईच्या मध्यभागी आहे. १९९८ साली या संग्रहालयाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय असं ठेवण्यात आलं. त्यापूर्वी या संग्रहालायचं नाव एक ब्रिटिश राजाच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators ची माहिती द्या, १,१११ बक्षीस मिळावा; ‘या’ शहरात लागले बॅनर)
छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाची इमारत इंडो-सारासेनिक शैलीतल्या वास्तुकलेमध्ये बांधण्यात आली आहे. यामध्ये मुघल, मराठा आणि जैन यांसारख्या इतर वास्तुकलेचे घटकही समाविष्ट आहेत. संग्रहालयाच्या मुख्य इमारतीच्या भोवताली ताडाची झाडं आणि सुंदर फुलांची बाग आहे.
या संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाची सुमारे ५०,००० प्रदर्शनं आजी परदेशातल्या कित्येक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या वस्तुंचं प्रामुख्याने तीन विभागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास असे हे तीन विभाग आहेत. या संग्रहालयामध्ये गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातली प्राचीन भारतातल्या सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि इतर अवशेष आहेत. (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
(हेही वाचा – Pune GBS : केंद्र सरकारचं सात तज्ज्ञांचं पथक पुण्यात ; जीबीएसचा धोका लक्षात घेता विहिरींवर लावणार विशेष यंत्रणा)
वास्तुकला
संग्रहालयाची इमारत ३ एकर एवढ्या क्षेत्रात वसलेली आहे. ही इमारत कुर्ला येथून आणलेल्या राखाडी बेसाल्ट आणि मालाड येथून आणलेल्या बफ रंगाच्या ट्रॅचाइट दगडांपासून तयार करण्यात आली आहे.
२००८ साली या संग्रहालयाचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. त्या वेळी संग्रहालयाच्या पूर्व विभागात पाच नवीन गॅलरी, एक संवर्धन स्टुडिओ, एक प्रदर्शन गॅलरी आणि एक चर्चासत्र कक्ष तयार करण्यासाठी ३०,००० चौरस फूट जागा तयार केली. या संग्रहालयात एक ग्रंथालयही आहे. (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
(हेही वाचा – architect salary : architect ला मिळतो भरमसाठ पगार! वर्षाला किती पैसे कमावतात architect?)
छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय इथले प्रवेश दर खालीलप्रमाणे आहेत :
- भारतीय प्रौढ दर्शक (वय वर्ष १५ पेक्षा जास्त)
₹१५० ते ₹२०० - संरक्षण दलाचे कर्मचारी/भारतीय ज्येष्ठ नागरिक (वैध ओळखपत्रासह)
₹१०० ते ₹१५० - भारतीय महाविद्यालयीन विद्यार्थी (वैध ओळखपत्रासह)
₹७५ ते ₹१२५ - भारतीय पर्यटकांचा ग्रुप (१५ किंवा त्यापेक्षा जास्त)
₹११० - भारतीय मुले (५ ते १५ वर्षं या वयोगटातली)
₹३५ - शाळेतर्फे येणारे इयत्ता १० वी पर्यंतचे विद्यार्थी
₹३५ - परदेशी प्रौढ दर्शक (वय वर्ष १५ पेक्षा जास्त)
₹७०० - परदेशी मुले (५ ते १५ वर्षं या वयोगटातली)
₹२०० - ऑडिओ गाईड (भारतीय पर्यटकांसाठी)
₹७५
(हेही वाचा – Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका)
कॅमेरा पास
- ट्रायपॉड शिवाय कॅमेरा
₹२०० - व्हिडिओ कॅमेरा
₹५०००
हेही पहा –
Join Our WhatsApp Community