shrivardhan beach resort मध्ये जा आणि अशाप्रकारे मनसोक्त आनंद लुटा!

39
shrivardhan beach resort मध्ये जा आणि अशाप्रकारे मनसोक्त आनंद लुटा!

श्रीवर्धन बीच हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हा समुद्रकिनारा अतिशय लांब किनारपट्टी असलेला आहे व खूप स्वच्छ देखील आहे. इथे तुम्हाला मूळ पांढरी वाळू पाहायला मिळते. समुद्रकिनारा दाट पाम वृक्षांनी व्यापलेला आहे. त्यामुळे हा नजारा डोळ्यात साठवून ठेवावासा वाटतो. (shrivardhan beach resort)

इथे तुम्ही पॅराग्लायडिंग, वॉटर सर्फिंग, डॉल्फिन पाहणे आणि बरेच काही करु शकता. श्रीवर्धन बीचपासून फक्त १ मिनिटाच्या अंतरावर हरिहरेश्वर बीच आहे आणि हरिहरेश्वर मंदिर देखील आहे. तसेच लक्ष्मी नारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर ही जवळपासची आकर्षणे आहेत. हापूस आंबा, कोकम, काजू आणि पारंपारिक लोणची विकणारी स्थानिक बाजारपेठ पाहू शकता आणि ताजे पकडलेले मासे, कोकणी आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ देणारी भरपूर रेस्टॉरंट्स. त्यापैकी श्रीवर्धन बीच रिसॉर्ट हे एक उत्तम रिसॉर्ट आहे. चला तर आपण श्रीवर्धन बीच रिसॉर्टबद्दल जाणून घेऊया… (shrivardhan beach resort)

(हेही वाचा – bhadra wildlife sanctuary : भद्रा वन्यजीव अभयारण्यात काय काय गंमत कराल?)

श्रीवर्धन बीच रिसॉर्ट हे जीवनेश्वर अली रोड, श्रीवर्धन, महाराष्ट्र येथे असून +९१ ९६८ ९५२ ११११ हा संपर्क क्रमांक आहे. वातानुकूलन असलेल्या आरामदायक खोल्या, एलईडी टीव्ही, खाजगी स्नानगृह आणि बाल्कनीसह काही खोल्या उपलब्ध आहेत. मोफत वायफाय, २४-तास फ्रंट डेस्क, दैनंदिन हाऊसकीपिंग आणि रूम सर्विस, तसेच काही खोल्यांमध्ये बाल्कनी, बाथटब आणि जकूझी अशा सुविधा दिल्या जातात. त्याचबरोबर थकवा घालवण्यासाठी आउटडोअर पूल, मनसोक्त हिंडण्यासाठी हिरवेगार गार्डन, लाउंज, मनोरंजनासाठी बिलियर्ड्स, मुलांचे खेळाचे क्षेत्र आणि गेम झोन इत्यादी गोष्टी असल्यामुळे तुमचा वेळ चांगला जातो. इथे मोफत खाजगी पार्किंग सुविधा दिली जाते. (shrivardhan beach resort)

ऑन-साइट रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट पर्याय मिळतात. बुफे, आ ला कार्टे आणि कॉन्टिनेंटल नाश्ता इथे तुम्ही पोट भरुन न्याहारी करु शकता. आणि हे सगळं तुम्ही फक्त रु. १८०० प्रति व्यक्ती प्रति रात्र (खोलीचा प्रकार आणि हंगामानुसार बदलते). मध्ये खोली बुक करुन मिळवू शकता. दुपारी १:०० पासून चेक-इन आणि सकाळी ११:०० पर्यंत चेक-आउट आहे. या हॉटेलमध्ये अमेरिकन एक्सप्रेस, मास्टर कार्ड, व्हिसा स्वीकारले जातात. एक खबरदारी अशी घ्यावी की इथे पाळीव प्राण्यांना परवानगी नाही. (shrivardhan beach resort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.