मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी हे आहेत उपाय

155

सध्या कोरोनाच्या या कठीण काळात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. भोवताली असलेली तणावाची परिस्थिती लोकांचे मानसिक संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे इतर व्याधी जडण्याचीही शक्यता आहे. हाच धोका टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही टिप्स देण्यात आल्या आहेत.

असे राखा मानसिक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना केल्या आहेत. सोशल मीडियाचा या निर्बंधांच्या काळात वापर वाढल्याने, त्यातील काही चुकीच्या माहितीमुळे तणाव वाढण्याचीही शक्यता असते. पण यावर मात करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने उपाय सुचवले आहेत.

सकारात्मक रहा

तणावरहित जगण्यासाठी सकारात्मक विचार करणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे जीवसैली सुधारण्यास मदत होऊ शकते. कुठल्याही गोष्टीचा ताण घेणे शक्यतो टाळा.

व्यायाम आणि ध्यानधारणा

मन आणि शरीर हे दोन्ही तंदुरुस्त असणं हे एक रामबाण वॅक्सिन आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योगासनं आणि ध्यानधारणा केल्याने शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते.

संपर्कात रहा

एकाकी जीवन जगत असल्याने डोक्यात विचारांचा कल्लोळ माजतो आणि त्यामुळे फार मोठा ताण येतो. त्यासाठी आपले नातेवाईक, मित्र परिवारासोबत कायम संपर्कात रहा आणि आपल्या मनातील विचार त्यांच्याकडे व्यक्त करा.

व्यसनांपासून लांब रहा

विविध व्यसनांपासून लांब राहणे हे निरोगी जीवनशैलीसाठी फार महत्त्वाचे आहे. सध्या सोशल मीडियाचेही व्यसन मोठ्या प्रमाणावर जडले आहे. त्यापासूनही दूर राहणे गरजेचे आहे.

व्यवस्थित झोप घ्या

रात्रीची झोप ही व्यवस्थित घ्या. उशिरापर्यंत जागल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते टाळणे फार आवश्यक आहे. रात्रीची झोप शरीरासाठी उत्तम असल्याने, ती पुरेशी घेणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.