सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नवा अध्याय!

164

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्कुबा डायव्हिंगला चालना मिळण्याच्या दृष्टीने देवबाग, तारकर्ली येथे आणण्यात आलेल्या एमटीडीसीच्या अत्याधुनिक अशा ‘आरमार’ या स्कुबा बोटीचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या अत्याधुनिक अशा बोटीच्या माध्यमातून खोल समुद्रात रात्रीच्या वेळी पाण्याखालचे जग न्याहाळता येणार आहे. रात्रीच्या वेळी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी ही बोट उपयोगी ठरणार आहे.

जिल्ह्याच्या पर्यटनासाठी प्रयत्न

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हे उद्दीष्ट असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, उद्योग आले पाहिजेत. पण त्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा आली नाही पाहिजे. कोकण हा निसर्ग संपन्न आहे. विकास करत असताना त्याचे सौंदर्य कोठेही कमी होऊ देणार नाही. जिल्ह्याच्या पर्यटनासाठी येथे कृषी पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील. तसेच तारकर्ली, मालवण, देवबाग येथे मोठ्या प्रमाणावर होम स्टे आहेत. त्यांच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. मंदिरांसाठी अध्यात्मिक पर्यटनाचा विकासही केला जाईल. तसेच बीच शॅक्स धोरणही राबवण्यात येत आहे. यासर्वांच्या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मितीसोबतच शाश्वत विकास साधता येईल. पर्यटनासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : कोकणचे कॅलिफोर्निया व्हाया गोवा! काय आहे हा अनोखा उपक्रम? )

स्कुबा डायव्हिंगच्या प्रात्यक्षिकांची पहाणी

जिल्ह्यातील स्कुबा डायव्हिंगला चालना मिळण्याच्या दृष्टीने देवबाग, तारकर्ली येथे आणण्यात आलेल्या अत्याधुनिक स्कुबा बोटीचे उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बोटीसह स्कुबा डायव्हिंगची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर इंन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग ॲन्ड ॲक्वेटिक स्पोर्ट्स येथे स्कुबा डायव्हिंगच्या प्रात्यक्षिकांची त्यांनी पहाणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर, पर्यटन सचिव वल्सा नायर, सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार अजय पाटणे, पर्टयन महामंडळाचे दीपक माने, डॉ. सारंग कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.