संभाषणापासून ते ऑनलाईन पेमेंटपर्यंत सर्वच गोष्टी आता मोबाईलवर होत असल्याने स्मार्टफोन सर्वांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोन अचानक काम करायचा बंद झाल्यास लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच चिडचिड होते. स्मार्टफोन एकटेपणा वाढवण्यासाठी कारणीभूत असून, स्मार्टफोनचं व्यसन आता मानसिक होत असल्याचा दावा मानसोपचार तज्ञांनी केला आहे.
लहान बाळांचे रडणे आवरण्यासाठी, आप्तस्वकीयांना व्हिडिओ कॉल करण्यासाठी ते समाज माध्यमांवर सातत्याने सक्रिय राहण्यासाठी मोबाईल आता गरजेचा होऊ लागला आहे. कित्येकदा फोन किंवा मेसेजिंग सुरू नसले तरीही समाज माध्यमावर सक्रिय राहण्यात दिवस जातो. याचा थेट परिणाम घरातील सदस्यांशी संवाद तुटण्यापर्यंत होऊ लागला आहे, अशा अनेक तक्रारी तर दिवसाला येत असल्याचे मानसोपचार तज्ञ सांगतात. मित्रपरिवार, नातेवाईक यांची भेटगाठ कमी होत बरेचजण एकांत काळात फक्त स्मार्टफोन वरती वेळ व्यतीत करणे पसंत करतात. स्मार्टफोनच्या अतिवापराने सतत चिडचिड आणि भांडण होत असेल तर संबंधितांनी वेळेस मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही मानसोपचार तज्ञांनी केले आहे.
हे करून पहा
– घरी असताना व्हाट्सअपवर वायफळ चॅटिंग करू नका
– कामानिमित्ताने घराबाहेर जास्त वेळ जात असेल घरातला वरती इंस्टाग्राम, फेसबुक रील्स बघत वेळ घालवू नका
– घरी सतत रील्सबनवण्याकडे लक्ष देऊ नका
– किमान जेवताना घरातल्या सर्व सदस्यांनी मोबाईल पाहणे टाळावे जेणेकरून एकमेकांसोबत संवाद होईल
– अनावश्यक व्हाट्सअप चॅट टाळण्यासाठी सेटिंग मध्ये आवश्यक बदल करा
– अनावश्यक समाज माध्यमांचे नोटिफिकेशन्स मोबाईल वरून बंद करून ठेवा
Join Our WhatsApp Community