Smriti Mandhana : असं आहे स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं कुटुंब

Smriti Mandhana : स्मृतीचं शिक्षण सांगली शहरात झालं आहे.

34
Smriti Mandhana : असं आहे स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं कुटुंब
  • ऋजुता लुकतुके

महिला क्रिकेटमध्ये ७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारी आणि रॉयल चॅलेंजर्सला पहिला वहिला आयपीएल करंडक जिंकून देणारी स्मृती मानधना (Smriti Mandhana) यशस्वी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तिच्या नावावर १४ आंतरराष्ट्रीय शतकं जमा आहेत आणि महिलांमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत ती चौथ्या क्रमांकावर आहे. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार तिने तीनदा पटकावला आहे. तर एकदा ती वर्षातील सर्वोत्तम आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ठरली होती.

१८ जुलै १९९६ ला मुंबईत तिचा जन्म झाला. तिचे वडील श्रीनिवास मानधना हे मारवाडी समाजातील आहेत आणि मुंबईत ते केमिकल वितरक म्हणून काम करत होते. पण, स्मृती (Smriti Mandhana) दोन वर्षांची असतानाच ते आपल्या कुटुंबीयांसह सांगलीतील एक उपनगर माधवनगर इथं राहायला गेले. स्मृतीचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतच झालं आहे. वडील श्रीनिवास सांगलीमध्ये जिल्हा स्तरीय क्रिकेट खेळलेले आहेत. तर स्मृतीचा (Smriti Mandhana) भाऊ श्रावणही महाराष्ट्राकडून १६ वर्षांखालील संघाकडून खेळेलेला आहे. भावाला मैदानावर धावा करताना बघून स्मृतीमध्ये क्रिकेट खेळण्याची उर्मी जागृत झाली.

(हेही वाचा – Honda NX200 Bike : होंडाच्या एनएक्स२०० बाईकला मिळाला नवा लुक, नवीन फिचर)

पुढे ती ९ वर्षांची असतानाच तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील संघात वर्णी लागली आणि तिथून तिने मागे वळून पाहिलं नाही. ऑक्टोबर २०१३ मध्ये तिच्या कारकीर्दीला निर्णायक वळण लागलं. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात सामन्यात तिने १५० चेंडूंत २२४ धावा केल्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोनशे धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. मागोमाग २०१६ मध्ये महिला चॅलेंजर्स स्पर्धेत भारतीय रेड संघाकडून खेळताना तिने (Smriti Mandhana) लागोपाठ तीन अर्धशतकं केली. पाठोपाठ तिला भारतीय संघातून खेळण्याची पहिली संधी मिळाली. पुढच्याच वर्षी ती भारताकडून कसोटी सामनाही खेळली. भारताकडून ७ कसोटी खेळताना तिने ५९ धावांच्या सरासरीने ६५९ धावा केल्या आहेत. तर ९७ एकदिवसीय सामन्यांत ४,२०९ धावा तिच्या नावावर आहेत. टी-२० प्रकारातही तिच्या नावावर ३,७२१ धावा आहेत.

क्रिकेटमध्ये मिळालेलं यश, विविध टी-२० लीगबरोबर झालेले करार आणि त्यातून मिळणाऱ्या जाहिराती यांच्या जोरावर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आतापर्यंत ३३ कोटी रुपयांची मालमत्ता उभी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.