स्नो वर्ल्ड मुंबई हे मुंबईतील सर्वोत्कृष्ट स्नो पार्क्सपैकी एक आहे. जिथे तुम्ही अतिशीत वातावरणात बर्फ आणि बर्फाच्या विविध खेळांचा आनंद लुटू शकता. तुम्हाला स्नो स्पोर्ट्सचा थरार अनुभवायचा असेल, तसेच बर्फवृष्टीची जादू किंवा बर्फाशी खेळण्याची मजा अनुभवायची असेल, तर स्नो वर्ल्ड मुंबईमध्ये नक्की या… (Snow World Mumbai)
मुंबईतील स्नो वर्ल्ड हे इनडोअर स्नो-थीम पार्क आहे. बाहेर कडक उन्हातही हिवाळा आणि बर्फवृष्टीची मजा घेऊ शकता. स्नो वर्ल्ड मधील तापमान-१० °से पर्यंत खाली येते. तुम्ही आइस स्केटिंग, स्नो स्लेजिंग आणि बर्फवृष्टीमध्ये नाचणे, खेळणे यासह बर्फामधील साहसी खेळांची भरपूर मजा घेऊ शकता. (Snow World Mumbai)
स्नो वर्ल्ड मुंबई सकाळी ११ ते रात्री ९:१५ पर्यंत सुरु असते. तुमच्या सोयीनुसार आणि उपलब्धतेनुसार तुम्ही वेगवेगळे टाईम स्लॉट निवडू शकता. प्रत्येक वेळेचा स्लॉट हा ४५ मिनिटांचा असतो. तुम्हाला तुमच्या स्लॉटच्या किमान १५ मिनिटे आधी येणे आवश्यक असते. जेणे करुन या अद्भुत अनुभवासाठी तुम्ही तयारी करु शकता आणि ॲक्सेसरीज घेऊ शकता. (Snow World Mumbai)
स्नो वर्ल्ड मुंबई हे मुंबई येथील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आहे. तुम्ही स्नो फाईट्स करु शकता, इग्लू आणि रेनडियरचे फोटो क्लिक करू शकता. इथे मुलांसाठी आणखी एक गंमत आहे, ती म्हणजे तुम्ही मुलांसोबत स्नोमॅन बनवू शकता. (Snow World Mumbai)
(हेही वाचा – Worli hit and run: राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी!)
पत्ता : लोअर ग्राउंड लेव्हल ५८-६१, फिनिक्स मार्केट सिटी, कमानी जंक्शन कुर्ला (प.), लाल बहादूर शास्त्री मार्ग, कमानी जंक्शन, मुंबई, महाराष्ट्र ४०००७०. (Snow World Mumbai)
स्नो वर्ल्ड मुंबई येथे तुम्हाला जॅकीट, हुड्स, ग्लोव्हज आणि स्नो बूट्स यांसारख्या थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणे देखील प्रदान केले जातात. तसेच काही गरम पेये आणि स्नॅक्सचा आनंद देखील तुम्हाला घेता येतो. स्नो वर्ल्ड मुंबईच्या तिकिटाची किंमत एका तासाच्या प्रत्येक सत्रासाठी प्रति व्यक्ती रु. ७०० आहे. (Snow World Mumbai)
स्नो वर्ल्ड हे मुंबईच्या मध्यभागी आहे आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही लोकल ट्रेन किंवा बसने येऊ शकता. ऑटो, टॅक्सी आणि खाजगी कॅब देखील मुंबईतून उपलब्ध आहेत. तर आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत काही अविस्मरणीय क्षण घालवायचे असतील तर स्नो वर्ल्ड मुंबईला नक्की भेट द्या. (Snow World Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community