तुम्ही FaceBook वापरताय? ‘या’ 3 सेटिंग्ज लगेच बदला, अन्यथा…

146

सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून फेसबुकला ओळखले जाते. या अॅप्लिकेशनवर युजर्सचा बराच वैयक्तिक डेटा देखील असतो. यामुळे हॅकर्सची त्यावर नजर असते. सोशल मीडियावर असणाऱ्या वैयक्तिक डेटा हॅक करून हॅकर्स त्याचा गैरवापर करताना दिसतात. यामुळे फेसबुकवरील गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे खालील तीन सेटिंग्ज लगेच बदला अन्यथा मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल.

1. तुमचे अकाऊंट कोणी केले लॉगइन

एका चुकीमुळे फेसबुकवरील तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमचे अकाऊंट कोणी दुसऱ्या व्यक्तीने लॉगइन केलेले नाही हे तपासावे लागेल. तुम्ही हे अगदी सहज तपासू शकता आणि तुमचे अकाऊंट सुरक्षित देखील ठेऊ शकतात.

(हेही वाचा – Facebook च्या COO शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा, मार्क झुकरबर्ग म्हणाले…)

जर तुमचे अकाऊंट इतर कोणत्याही ब्राउझर किंवा डिव्हाइसवर लॉगइन केले असेल, तर फेसबुक तुम्हाला याबद्दल सावधानतेचा इशारा देते. यानंतर, तुम्ही अकाऊंट तपासून सहज लॉगआउट करू शकता. कोणत्या डिव्हाइसवरून लॉगइन केले आहे ते तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्ही कोणतेही लॉगिन ओळखत नसाल तर तुमचा पासवर्ड आवश्य बदला. यासाठी तुम्हाला फेसबुक ओपन करून सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंट सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटी सेटिंग्जमध्ये जावे लागेल.

2. फेसबुक लोकेशन हिस्ट्री बंद करा

फेसबुकच्या Android आणि iOS अॅप्सद्वारे लोकेशन हिस्ट्रीची माहिती कंपनी गोळा करते. हा डेटा फेसबुक सेटिंग्जद्वारे अॅक्सेस करता येतो. iOS वर ऍक्सेस करण्यासाठी, तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी शॉर्टकटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला Manage your location settings मध्ये जावे लागेल. तुम्ही येथे असलेल्या निळ्या स्लाइडरसह लोकेशन हिस्ट्री चालू किंवा बंद करू शकता. Android डिव्हाइसेसवर, तुम्ही Settings & privacy > Privacy Shortcuts > Manage your location settings मध्ये जाऊन लोकेशन हिस्ट्री बंद करू शकता.

3. एनक्रिप्शन वापरा

तुम्ही फेसबुक मेसेंजर वापरत असल्यास, तुम्ही एनक्रिप्शन अॅक्टिव्ह करून सुरक्षितता वाढवू शकता. फेसबुक मेसेंजरवरील एन्क्रिप्शन तुमचे मेसेज अधिक खाजगी बनवेल. कंपनीचा दावा आहे की, फेसबुक देखील एन्क्रिप्टेड मेसेंजर मजकूर वाचू शकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.