उन्हाळा आला की, बाजारपेठांमध्ये आंब्यांचे आगमन होते. आंबा म्हणजे प्रत्येकाचे आवडीचे फळ, म्हणूनच मुंबईतील अनेक रेस्टॉरंट, कॅफेज्, हॉटेल्समध्ये मॅंगो सिझन सुरू होतो. उपहारगृहांमध्ये मॅंगो मिल्कशेक, मॅंगो केक, आमरस पुरी अशा पदार्थांना मागणी वाढते.
( हेही वाचा : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! नाहीतर… )
आंब्याच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईतील काही ठिकाणे
1. किल नो कॅलरी, ठाणे
हा कॅफे ठाण्याला असून येथील मॅंगो शेक, मॅंगो चीजकेक, मॅंगो केक प्रसिद्ध आहे.
2. बास्टियन, बांद्रा
वांद्रेतील बास्टियन कॅफेमधील ओलसर व्हॅनिला स्पंज केक, मँगो फ्रॉस्टिंग, मँगो ग्लेझ आणि अल्फोन्सो आंबे याने परिपूर्ण अशी मँगो पुल-मी केक ही डिश खवय्यांना आकर्षित करते.
3. श्री ठाकर भोजनालय, मरिन्स
मरिन्स लाईन्स येथील श्री ठाकर भोजनालय येथील जेवणाच्या थाळीतील आमरस हा अविभाज्य भाग आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला ठाकर भोजनालयामध्ये अनलिमिटेड आमरसचा आनंद घेता येईल.
4. जंगल किंग, घाटकोपर
या उन्हाळ्यात जंगल किंग ज्यूस सेंटरमधील कोकनट-मॅंगो फ्यूजन शेक नक्की ट्राय करा.
5. सोम रेस्टॉरंट, गिरगाव चौपाटी
सोम रेस्टॉरंट थाळी आणि अस्सल गुजराती खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील आमरस प्युअर हापूस आंब्यांपासून बनवला जातो.
6. आस्वाद, दादर
आस्वादमधील अवॉर्ड विनिंग मिसळ व्यतिरिक्त येथील आमरस पुरी सुद्धा नक्की ट्राय करा. आस्वादमध्ये दर उन्हाळ्यात मॅंगो फेस्टिव्हल साजरा केला जातो.