-
ऋजुता लुकतुके
स्पाईसजेट ही भारतातील स्वस्त विमान प्रवास घडवून आणणारी विमान कंपनी आहे. कोव्हिड १९ च्या काळात जगभरातील विमान कंपन्यांना जसा फटका बसला, तसाच तो स्पाईसजेटला बसला आहे. आणि त्यातून सावरून आर्थिक बाजू भक्कम करण्याचा आता कंपनीचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने गेल्याच आठवड्यात कंपनीच्या बाजूने एक सकारात्मक घटना घडली. जेनेसिस कंपनीबरोबर स्पाईसजेटचं प्रलंबित प्रकरण परस्पर सहमतीने मिटलं. हे प्रकरण १६ दशलक्ष अमेरिकन डॉलरचं होतं.. (Spicejet Share Price)
(हेही वाचा- Chenab Railway Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण)
त्यामुळे स्पाईसजेटला दिलासा मिळाला आहे. या बातमीनंतर गेल्या आठवड्यात गुरुवारी स्पाईसजेटच्या शेअरमध्ये एकाच दिवशी ८ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. आणि नंतरच्या ५ दिवसांत एकूण वाढ १५ टक्के इतकी होती. शुक्रवारी (२७ डिसेंबर) शेअर बाजार बंद होताना हा शेअर थोडा खाली आला होता. ५६.४६ वर तो बंद झाला आहे. (Spicejet Share Price)
Insert screenshot
जेनेसिस ही विमानं भाड्याने देणारी कंपनी आहे. आणि दोन कंपन्यांमध्ये झालेल्या तहानुसार, जेनेसिस कंपनीला देणं लागत असलेल्या १६ दशलक्ष अमेरिकन डॉलरपैकी ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर स्पाईसजेट आता देऊन टाकणार आहे. आणि ४ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीचे स्पाईसजेटचे शेअर त्यांना मिळणार आहेत. एका शेअरची किंमत १०० रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. (Spicejet Share Price)
(हेही वाचा- PMP Bus : नवीन वर्षात पीएमपीच्या ताफ्यात येणार नव्या 1600 बस)
कोव्हिडनंतरच्या आर्थिक संकटात स्पाईसजेटने विविध कर्जदार कंपन्यांशी अशा प्रकारच्या वाटाघाटी केल्या आहेत. होरायझन एव्हिएशन, इंजिन लीज फायनान्स कॉर्पोरेशन, एअरकॅसल, विल्मिंगटन ट्रस्ट अशा आंतरारष्ट्रीय कंपन्यांबरोबरचे करारही अशाच पद्धतीने पार पडले आहेत. स्पाईसजेटवरील कर्जाचं ओझं त्यामुळे कमी झालं आहे. आणि ही सकारात्मकता कंपनीतील शेअर गुंतवणूकदारांमध्येही पसरली आहे. (Spicejet Share Price)
स्पाईसजेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अजय सिंग यांनी या वाटाघाटींबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. पण, कंपनीवरील आर्थिक दडपण एकीकडे कमी होत असतानाच कंपनीचा तिमाही ताळेबंद अजून सुधारलेला नाही. सप्टेंबर २०२४ चा ताळेबंद जाहीर करताना कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात २० टक्के तूट नोंदवली आहे. कंपनीचं शेअर बाजारातील भांग भांडवल ७,६९२ कोटी रुपये इतकं आहे. (Spicejet Share Price)
(हेही वाचा- सपा नेत्याने Shiva Temple वर अतिक्रमण करून बांधले ३ मजली घर; शिवलिंग आणि मूर्ती फेकल्या विहिरीत)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी विक्रीवर सल्ला देत नाही.) (Spicejet Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community