ssc full form : काय आहे ssc चा फुल फॉर्म? काय आहे या शब्दाचा अर्थ?

215
ssc full form : काय आहे ssc चा फुल फॉर्म? काय आहे या शब्दाचा अर्थ?
आपण बर्‍याचदा म्हणतो की मी दहावीमध्ये अमूक अमूक गुणांनी उत्तीर्ण झालो. मला दहावीला चांगले मार्क पडले होते. तर दहावी म्हणजे एसएससी. एसएससी हा खरंतर उच्च शिक्षणाचा पाया असतो. एसएससी उत्तीर्ण झाल्यावरच आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश करता येतो आणि मग आपल्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. (ssc full form)
ssc चा फुल फॉर्म
तुम्हाला माहिती आहे का की ssc चा फुल फॉर्म काय आहे? एसएससी म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. इंग्रजीमध्ये यास सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणतात. ही एक सार्वजनिक परीक्षा आहे जी बांगलादेश, भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव सारख्या देशांतील शैक्षणिक मंडळांद्वारे घेतली जाते. (ssc full form)
एसएससी परीक्षा म्हणजे काय?
एसएससी परीक्षा म्हणजे माध्यमिक शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणे होय. एसएससी परीक्षा पूर्ण करणे म्हणजे तुमचे शालेय शिक्षण पूर्ण करणे होय! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही महाविद्यालयात प्रवेश करु शकतात. त्यामुळेच एसएससी करणे महत्त्वाचे आणि अनिवार्य आहे. (ssc full form)
सेकेंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय?
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र/दि सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट (SSC) किंवा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला/सेकेंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट (SSLC) हे माध्यमिक शाळा स्तरावरील त्यांच्या अभ्यासाच्या शेवटी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. (ssc full form)
भारतातील एसएससी बोर्ड
आपल्या भारतामध्ये या सर्टिफिकेटला सामान्यतः “इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा” असे संबोधले जाते. अनेक राज्यांमध्ये एसएससीला “मॅट्रिक्युलेशन” म्हणूनही ओळखले जाते. ही परीक्षा पुढील शिक्षणासाठी आधार म्हणून घेतली जाते आणि विद्यार्थी एसएससी परीक्षेनंतर दोन वर्षांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र/हायर सेकेंडरी सर्टिफिकेट (HSC) परीक्षा देऊ शकतात. म्हणजेच कॉलेजचा पहिला टप्पा त्यांनी पार केलेला असतो. (ssc full form)

कधी असते परीक्षा?

तुम्ही नववी उत्तीर्ण झाल्यावर आपोआप दहावीत जाता. वर्षभर हा अभ्यासक्रम चालतो. एसएससी परीक्षा ही भारतातील सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते. एसएससी परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीवरून विद्यार्थी कोणते क्षेत्र निवडणार हे ठरवले जाते. SSC परीक्षा पुढील शिक्षणाचा पाया असते आणि साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ही परीक्षा संपन्न होते. (ssc full form)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.