ssc gd constable : एसएससी जीडी कॉन्स्टेबलचा जॉब प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या काय असतात?

27
ssc gd constable : एसएससी जीडी कॉन्स्टेबलचा जॉब प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या काय असतात?
एसएससी जीडी कॉन्स्टेबलची मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत : 
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबलची प्राथमिक जबाबदारी म्हणजे त्यांची पोस्टिंग असलेल्या क्षेत्रात अशांतता निर्माण झाली तर कायद्याचं रक्षण करून पुन्हा शांतता प्रस्थापित करणे होय.
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल्सकडे व्हीआयपी व्यक्ती आणि जीव धोक्यात असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीचंही संरक्षण करण्याची जबाबदारी असते.
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल्स हे सीमापार होणारी तस्करी, बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर सीमा उल्लंघन थांबवतात.
  • उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक नसेल तर एसएससी जीडी कॉन्स्टेबल्सना आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या क्रियाकलापांचं आणि कर्तव्यांचं पर्यवेक्षण करावं लागतं. (ssc gd constable)

(हेही वाचा – Manipur मध्ये खंडणी आणि तस्करीमध्ये सहभागी असलेले 3 अल्पवयीन मुलांसह 5 अतिरेक्यांना अटक)

एसएससी जीडी कॉन्स्टेबलची जॉब प्रोफाइल

एसएससी जीडीसाठी सैनिक “जनरल ड्युटी” जॉब प्रोफाइल ही अत्यंत आव्हानात्मक आहे. इतर ट्रेंड सैनिकांच्या तुलनेमध्ये या सैनिकांचं प्रशिक्षण विशेषतः कठोर असतं.

एसएससी जीडी कॉन्स्टेबलच्या पदासाठी उमेदवाराची निवड केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवलं जातं. नियुक्त करण्यात आलेल्या कॉन्स्टेबल्सना १५ दिवसांसाठी प्रशिक्षण शाळेत सामील व्हावं लागतं. त्यानंतर सर्व्हिस बुक, प्राण फॉर्म आणि शपथ पुस्तकासह सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला दिल्या जातात. जसं की,

  • ड्रिलिंग
  • इनडोअर क्लासेस
  • ध्वज फडकवणे
  • मार्चिंग
  • इतर फिजिकल ऍक्टिव्हिटी
  • (ssc gd constable)

(हेही वाचा – harihar fort : हरिहर किल्ल्याबद्दलची अद्भुत माहिती वाचून तुम्ही व्हाल थक्क!)

प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर जीडी कॉन्स्टेबलकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतात :  
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल हे ज्यावेळी उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक उपस्थित नसतील त्यावेळी पोलिस स्थानकाचा प्रभारी म्हणून काम करतात.
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल हे प्रतिनियुक्तीवर असताना गार्ड किंवा एस्कॉर्ट म्हणूनही काम करतात.
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल्सना तपास करण्याचे अधिकार असतात.
  • याव्यतिरिक्त एसएससी जीडी कॉन्स्टेबल्सना स्टेशन रायटर, तसंच ग्रामीण आणि शहर पोलिस स्थानकामधल्या बीट क्षेत्रांचं नियंत्रण करणारे सशस्त्र राखीव अधिकारी, चौकी आणि गार्डचा प्रभारी अधिकारी यासारखी कर्तव्ये पार पाडावी लागतात.
  • (ssc gd constable)

(हेही वाचा – oarfish : ओअरफिश या माश्याचं रहस्य काय आहे? हा मासा खरोखर समुद्री राक्षस आहे का?)

एसएससी जीडी कॉन्स्टेबलची पदोन्नती आणि कारकिर्दीत वाढ

एसएससी जीडी कॉन्स्टेबलला पदोन्नती मिळाल्यानंतर, त्यांच्या पदोन्नतीच्या प्रत्येक स्तरावर त्यांचा पगार वाढतो.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल्सचा पदोन्नतीचा पदानुक्रम खालीलप्रमाणे असतो : 
  • वरिष्ठ कॉन्स्टेबल
  • हेड कॉन्स्टेबल
  • सहाय्यक उपनिरीक्षक
  • उपनिरीक्षक
  • निरीक्षक

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.