विद्यार्थ्यांनो, परीक्षाकाळात तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘ही’ योगासने

162

फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतात. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येसुध्दा तणावाचे वातावरण असते. हा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थांच्या दिनक्रमात बदल न करता, वेळेचे नियोजन करून, थोडा वेळ योगाभ्यासासाठी देणं आवश्यक आहे. योग केल्यामुळे परीक्षेच्या ताण तणावांना सामोरे जाण्याचे मनोबल विद्यार्थ्यांना प्राप्त होते. तसेच स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी योग आवश्यक आहे. योगासनाबरोबरच प्राणायाम, ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते. मन शांत, तणावरहित, चिंतामुक्त होण्यास मदत होते.

विद्यार्थांसाठी लाभदायक योगासने

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार घातल्यामुळे स्नायूंना व्यायाम मिळतो, शरीर योग्य प्रमाणात ताणले जाते, शरीराची लवचिकता वाढते आणि हृदयाचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण होते. सूर्यनमस्काराने चिंता, ताण तणाव आणि मनःस्थितीत बदल कमी होऊन एकाग्रता वाढते.

ताडासन

या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. पण अन्नपदार्थ खाल्यानंतर करू नये. ताडासन करताना मणक्याचा पूर्ण भाग ताणला जातो आणि सैल सोडला जातो. या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.

( हेही वाचा: IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना )

पर्वतासन

या आसनामुळे पायाच्या स्नायुंमध्ये, गुडघ्याच्या मागील स्नायुंमध्ये तसेच पाठीतील स्नायुंमध्ये ताण निर्माण होतो. यामुळे थकवा कमी होऊन विद्यार्थांमधील स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

अनुलोम विलोम

अनुलोम विलोम प्राणायामाच्या सरावामुळे नाड्या शुध्द होण्यास मदत होते. शरीरात आलेला थकवा, आळस कमी होतो. या प्राणायामाच्या सरावामुळे विद्यार्थांमधील ताण तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते.

ध्यान

विद्यार्थांनी दररोज किमान ५ ते १० मिनटे ध्यान करावे. ध्यानामुळे विद्यार्थांमध्ये परीक्षेसंबंधी असलेली भीती कमी होऊन भावनात्मक स्थिरता वाढेल. तसेच एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.