५ हजारापर्यंत गुंतवणूक करून सुरू करा व्यवसाय! सरकारही करेल मदत, काय आहे ही योजना?

कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. लॉकडाऊन संपल्यावर बहुतांश लोकांनी व्यवसाय करण्याकडे आपला मोर्चा वळवला. असाच एक व्यवसाय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. सरकार सुद्धा या व्यवसायाला प्रोत्साहन देते. अलिकडच्या काळात कुल्हडमधील चहा विशेष आकर्षण ठरत आहे. कुल्हडमधून चहा पिण्याचा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अगदी रस्त्यापासून, मेट्रो स्टेशनपर्यंत सगळीकडे कुल्हड चहा मिळतो. हा व्यवसाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कुल्हड योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरात तरुणांना इलेक्ट्रिक चक्र देते. यापासून कुल्हडसह अन्य मातीची भांडी तयार केली जाऊ शकतात. या व्यवसायात तुम्हाला प्राथमिक ५ हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, २०२० मध्ये केंद्र सरकराने देशभरात २५ हजार इलेक्ट्रिक चाकांचे वाटप केले.

कुल्हडमध्ये बनवले जाणारे विविध पदार्थ

तरुणाई संकल्पनेनुसार कुल्हड तंदुरी चहा, कुल्हड कॉफी अशा विविध मेन्यूचा विचार करून ग्राहकांना आकर्षित करू शकते. सध्या कुल्हड मॅगी, चहा, कॉफी, चिकन इत्यादी डिशेस तरूणाईच्या फेव्हरेट आहेत. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करून व्यवस्थित योजना केल्यास तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो.

(कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here