station master salary : तुम्हाला माहिती आहे, स्टेशन मास्टरला किती पगार मिळतो?

353
station master salary : तुम्हाला माहिती आहे, स्टेशन मास्टरला किती पगार मिळतो?

स्टेशन मास्टर (SM) म्हणजे भारतीय रेल्वे भरती मंडळाद्वारे नियुक्त केलेला एक कार्यकारी अधिकारी. मुंबईतील लोक अधिकतम रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे त्यांना स्टेशन मास्टरबद्दल (station master salary) एक वेगळे आकर्षण असते. आज आम्ही तुम्हाला स्टेशन मास्टर नेमके काय काम करतात, त्यांच्या जबाबदार्‍या काय असतात आणि त्यांन अपगार किती असतो याबद्दल विस्तृत माहिती देणार आहोत.

स्टेशन मास्टरच्या जबाबदाऱ्या :
  • सिग्नल्स, लेव्हल क्रॉसिंगवर पॉइंट गेट्स आणि संपूर्ण सिस्टीम मशीनरीचे निरीक्षण करणे.
  • केबिन, सिग्नल, लॅंप्स, लेव्हल क्रॉसिंग गेट्स, वेटिंग मशीन्स, सामान आणि स्टेशन यार्डची तपासणी करणे.
  • स्टेशनची स्वच्छता आणि देखभाल झाली आहे का, हे पाहणे.

(हेही वाचा – Congress Survey : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला तिलांजली)

पात्रता :
  • चष्म्याशिवाय ६/९, ६/९ एवढी दूरची दृष्टी आणि चष्म्याशिवाय एसएन ०.६, ०.६ एवढी जवळची दृष्टी.
  • कलर व्हिजन, बायनोक्युलर व्हिजन, नाइट व्हिजन आणि मायोपिक व्हिजन चाचण्या उत्तीर्ण करणे.
विशेष आवश्यकता :
  • स्त्री किंवा पुरुष किंवा कोणतीही व्यक्ती अर्ज करु शकते.
  • वारंवार हालचाली करण्याची आवश्यकता असल्यामुळे शारीरिक अक्षम उमेदवार अर्ज करु शकत नाहीत.

(हेही वाचा – येत्या विधानसभेला Sharad Pawar डझनभर घरांमध्ये तरी फूट पाडतील?)

स्टेशन मास्टरला मिळणारा पगार :

भारतात नव्याने नियुक्त झालेल्या स्टेशन मास्टरला अंदाजे रु. ५५,७७६ पगार मिळतो. याव्यतिरिक्त, त्यांना त्यांच्या शिफ्टच्या आधारावर रात्रीचा भत्ता मिळतो. रेल्वे स्टेशन मास्टरचे वेतन तपशील खालीलप्रमाणे आहेत :

मूळ वेतन : रु. ३५,४००
ग्रेड पे : रु. ४,२००
महागाई भत्ता (डीए, सध्या मूळ वेतनाच्या ३४%) : रु. १२,०३६
निश्चित प्रवास भत्ता : रु. २०१६
घर भाडे भत्ता (स्थानानुसार बदलते) : किमान रु. ३,१८६
हातात येणारा पगार : रु. ५६,८३८ 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.