चांगली हेअरस्टाईल आत्मविश्वास वाढवते. तुमचा लूक बदलण्यासाठी चांगली हेअरस्टाईल निवडणे आवश्यक आहे. चांगली हेअरस्टाईल निवडण्याचे काही टप्पे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- सलूनमध्ये जाण्यापूर्वी किंवा DIY केस कापण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल (new hairstyle men) करायची आहे, ते ठरवा. त्यासाठी नियतकालिके, वेबसाईट्स या ठिकाणी त्या विषयी तुम्हाला माहिती मिळेल. चांगली हेअरस्टाईल निवडण्यापूर्वी चेहऱ्याचा आकार, केसांचा पोत या घटकांचा विचार नक्की करा. (New Hair Style for Boys)
(हेही वाचा – Hair Style For Lehenga: ‘लेहंगा’ परिधान केल्यावर आकर्षक केशरचनेचे पर्याय कोणते, वाचा सविस्तर…)
- हेअरस्टाईल चांगली होण्यासाठी चांगला हेअरस्टायलिस्ट (Good hairstylist) असणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला जी हेअरस्टाईल करायची आहे, ती चांगल्या प्रकारे करू शकणाऱ्या हेअरस्टायलिस्टचा शोध घ्या ! तुम्हाला कशी हेअरस्टाईल करायची आहे, याविषयी त्यांच्याशी चर्चा करा ! त्यांचीही त्याविषयी काही मते आहेत का, ते जाणून घ्या.
- केस चांगले कापले जाण्यासाठी केसांच्या कडा बारीक करणे, नेकलाइन आकर्षक करणे यांवर भर दिला जात आहे का, यावर लक्ष द्या. आकर्षक आणि व्यावसायिक हेअरस्टाईल होण्यासाठी अचूकता महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या.
- केलेली हेअरस्टाईल अधिक काळ चांगली दिसण्यासाठी कोणते जेल किंवा क्रीम वापरणे आवश्यक आहे, ते जाणून घ्या.
- या सर्व टप्प्यांवर आकर्षक हेअरस्टाईल होण्यासाठी प्रयत्न केल्यास सर्व ठिकाणी तुम्ही नक्कीच एक आकर्षक व्यक्ती म्हणून ओळखले जाल ! (New Hair Style for Boys)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community