तुम्ही सोपा पासवर्ड तर ठेवत नाहीत ना; नाहीतर व्हाल कंगाल

93

देशात आणि जगातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे अतिशय ‘साधा पासवर्ड’ हा सर्वात धोकादायक ठरत असून, लाखो रुपये खात्यातून वळते केले जाऊ शकतात. देशातील प्रत्येक शहरी नोकरदार व्यक्ती सरासरी 10 ते 15 पासर्वड वापरत असते. नाॅर्डपास 2022 च्या अभ्यासानुसार, पासवर्ड विसरण्याच्या भीतीने लोक बहुतेक अॅप्समध्ये समान पासवर्ड किंवा अगदी साधा पासवर्ड निवडत असून, ते सायबर गुन्हेगारांना बळी पडत आहेत. दररोज 30 कोटींहून अधिक वेबसाईट हॅक केल्या जात असून, दरवर्षी सुमारे 6 ट्रिलियन डाॅलरचे नुकसान होत आहे.

महिला सावध, पुरुष बेफिकीर

अभ्यासानुसार, जगभरातील 43 टक्के महिला ऑनलाईन स्टोअर, 57 टक्के बॅंका, 50 टक्के खासगी ई-मेल आणि 38 टक्के मोबाईल अॅप्समध्ये मजबूत पासवर्ड वापरतात. यामुळेच महिला सायबर हल्ल्यांना कमी बळी पडतात. त्याचवेळी, 36 टक्के पुरुष ऑनलाईन स्टोअरमध्ये, 50 टक्के बॅंका आणि इतर आर्थिक खात्यांमध्ये, 42 टक्के खासगी ई-मेलमध्ये आणि 31 टक्के मोबाईल अॅप्समध्ये भक्कम पासवर्ड वापरतात.

( हेही वाचा: आजारपण उद्धव ठाकरेंचं आणि मनोहर पर्रीकर यांचं… )

कोणता पासवर्ड सुरक्षित?

कोणताही अर्थ नसलेला पासवर्ड शोधणे खूप अवघड आहे. म्हणून, शब्दकोषातील शब्द किंवा कीबोर्डवरील क्रमाने असेलली अक्षरे वापरु नका. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी कंपनीच्या नावाच्या शेवटी चार शब्द टाका. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्मचा पासवर्ड लक्षात राहतो. पासवर्डमध्ये अंकासह इतर अक्षरे असावीत, असा प्रयत्न केला पाहिजे.

-डिजिटल सुरक्षा असोसिएशन ऑफ इंडिया, अध्यक्ष व्ही. राजेंद्रन

जगभरातील प्रसिद्ध पासवर्ड

  • 123456
  • 123456789
  • qwerty
  • 1234
  • qwerty 123
  • 1q2w3e
  • 111111
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.