पोलिस उपनिरीक्षक (sub inspector) हे भारतीय पोलिस सेवेतील एक महत्त्वाचे पद आहे. उपनिरीक्षक हे कॉन्स्टेबलचे प्रमुख आणि विशिष्ट पोलिस स्टेशनचे प्रमुख असतात. पोलिस उपनिरीक्षकाला भारतीय पोलिस सेवेतील करिअरमधील यश, पदोन्नती आणि अनुभवाच्या आधारे उच्च पदापर्यंत पोहोचण्याचा चांगला वाव आहे आणि पुढे पगारही वाढत जातो. (sub inspector salary)
पदोन्नती झाल्यानंतर उपनिरीक्षक हा पोलिस निरीक्षक होतो. या प्रतिष्ठित पदावर काम करण्यासाठी प्रत्येकामध्ये कठोर परिश्रम, शिस्त आणि नोकरीचा आदर करणे आवश्यक आहे. या पदावर असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी बांधिलकीची भावना, कर्तव्यदक्षता महत्त्वाची असते. (sub inspector salary)
(हेही वाचा – News Year 2025 : नवीन वर्षात खगोलीय घटनांची रेलचेल; चार ग्रहणे, 11 उल्कावर्षाव, सुपरमूनची नवलाई)
पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्यांची बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी. याशिवाय, पोलीस दलात उमेदवारांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य/केंद्रीय स्तरावरील परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार २० ते २५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (sub inspector salary)
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणीच्या आधारे केली जाईल. पोलिस उपनिरीक्षकाला पगारही चांगला मिळतो. मात्र राज्यांनुसार पगार ठरवला जातो आणि पदोन्नती व अनुभवानुसार त्यात बढती होते. सरासरी, पगाराची श्रेणी वार्षिक रु. ४.२ लाख ते रु. ९.४ लाखांपर्यंत असते. वेगवेगळ्या राज्यांमधील सरासरी पगाराची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत : (sub inspector salary)
(हेही वाचा – अबब! ६७ लाख स्क्वेअर फूट आणि ४,२०० ऑफिसेस असलेले surat diamond bourse आहे तरी काय?)
दिल्ली :
रु. ६.७ लाख
पश्चिम बंगाल :
रु. ४.३ लाख प्रतिवर्ष
तामिळनाडू :
रु. ४.६ लाख प्रतिवर्ष
उत्तर प्रदेश :
रु. ६.९ लाख प्रतिवर्ष
केरळ :
रु. ८.१ लाख प्रतिवर्ष
महाराष्ट्र :
रु. ७.३ लाख प्रतिवर्ष
मूळ वेतनाव्यतिरिक्त पोलिस उपनिरीक्षकाला वैद्यकीय विमा, पेन्शन आणि वाहतूक, गृहनिर्माण आणि गणवेश यासारखे इतर लाभ देखील मिळू शकतात. (sub inspector salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community