sugarcane juice benefits in pregnancy : उसाच्या रसात असतात अनेक पोषक घटक; गरोदरपणातही मिळतात आश्चर्यकारक फायदे

56
sugarcane juice benefits in pregnancy : उसाच्या रसात असतात अनेक पोषक घटक; गरोदरपणातही मिळतात आश्चर्यकारक फायदे

तळपत्या उन्हाळ्यात शरीराचं तापमान थंड ठेवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी उसाचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. कोणत्याही प्रकारची रसायने नसलेला आणि अनेक आरोग्यदायी फायदे असलेला हा उसाचा रस, कॅन केलेल्या इतर पेयांपेक्षा एक उत्तम पर्याय पर्याय आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला ऊसाच्या रसाचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. एनर्जी बूस्टर, वजन कमी करण्यास मदत तसंच तारुण्य टिकवून ठेवणे असे एक ना अनेक फायदे ऊसाचा रस प्यायल्याने मिळतात. गरोदरपणातही तुम्हाला अनेक फायदे मिळतात. (sugarcane juice benefits in pregnancy)

शारीरिक आरोग्यासाठी उसाच्या रसाचे फायदे कोणते?

उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात. ऊसाचा रस हा नैसर्गिक एनर्जी बूस्टर आणि रिफ्रेशनर म्हणून काम करतो त्यामुळे ते एक लोकप्रिय पेय आहे. उसाच्या रसामध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आणि शरीराला पोषक असे घटक असतात.

एनर्जी बूस्टर

दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवत असेल तर स्वतःला रिफ्रेश आणि रिचार्ज करण्यासाठी एक ग्लास उसाचा रस प्या. त्यातलं नैसर्गिक साखरेचं प्रमाण तुमच्या शरीराला लगेचच ऊर्जा देतं. त्यामध्ये मुबलक प्रमाणात ग्लुकोज असतं त्यामुळे हे एक लोकप्रिय एनर्जी बूस्टर आहे. (sugarcane juice benefits in pregnancy)

(हेही वाचा – Places of Worship Act 1991 वरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली)

चयापचय क्रिया सुधारते

उसाच्या रसामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते. उसाचा रस आतड्यांची नियमितता वाढवतो आणि बद्धकोष्ठता रोखून अन्नपचन करण्यास मदत करतो. ऊसाच्या रसातल्या अल्कधर्मी गुणधर्मामुळे पोटातली पीएच ची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. तुमच्या दैनंदिन जीवनात उसाच्या रसाचं सेवन केलं तर पचनसंस्था निरोगी राहते.

कोलेस्टेरॉल आटोक्यात राहते

रिसर्चमधून असं लक्षात आलं आहे की, ऊसाचा रस प्यायल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. एवढंच नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी सर्व तक्रारी दूर होतात.

वजन कमी करायला मदत मिळते

उसाचा रस हा वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. कारण ऊसाच्या रसात कमी कॅलरीज असतात आणि फॅट्स नसतात त्यामुळे उसाचा रस वजन कमी करण्यासाठी एक उपयुक्त पेय ठरतो. (sugarcane juice benefits in pregnancy)

(हेही वाचा – chia seeds benefits : चिया सिड्सचे हे टॉप ५ फायदे जाणून घ्या; हा चमत्कारिक पदार्थ तुमच्या जेवणात समाविष्ट करा)

मूत्रपिंड निरोगी राहतात

मूत्रपिंडांचं कार्य सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आणि मूत्रपिंडांतून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करणारे गुणधर्म उसामध्ये असतात. त्यामुळे मूत्रपिंडांचं आरोग्य वाढतं आणि मूत्रपिंडातल्या स्टोनचा धोका कमी होतो.

सौंदर्यवर्धक उसाचा रस

उसाचा रस हा फ्लेव्होनॉइड्स आणि फेनोलिक संयुगांसारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. उसाचा रस मुक्त रॅडिकल्सशी लढून, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतो आणि तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो.

रक्तदाब नियंत्रित राहतो

उसाच्या रसामध्ये असलेल्या उच्च पोटॅशियम घटकांमुळे आणि त्यातल्या रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या खनिज पदार्थांमुळे शरीराच्या रक्तदाबाचं प्रमाण नियंत्रित राहतं. उसाच्या रसात असलेलं पोटॅशियम हे शरीरात द्रव संतुलन नियंत्रित करण्यात आणि योग्य स्नायूंच्या कार्याला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. (sugarcane juice benefits in pregnancy)

(हेही वाचा – परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा गुजरात दौरा; परिवहन व्यवस्थेचे केले कौतुक)

गरोदरपणात उपयुक्त

गर्भवती महिलांना उसाच्या रसातील पोषक तत्वांचा फायदा होऊ शकतो. त्यामध्ये फोलेट आणि लोह सारखे पोषक घटक असतात. हे घटक गर्भाच्या विकासासाठी मदत करतात आणि जन्मजात दोष टाळतात. वर दिलेले अनेक लभ गरोदरपणातही मिळतात.

उसाच्या रसाचं नियमित सेवन केल्याने शरीरात प्रथिनांची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे स्टोन, यूटीआय, लैंगिक संक्रमित रोग आणि प्रोस्टेटायटीस (पुरुषांमध्ये सेमिनल फ्लुइड तयार करणाऱ्या ग्रंथींची जळजळ) यासारख्या विविध मूत्रपिंडाशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत मिळते.

पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, उसाचा रस प्यायल्याने प्राथमिक आराम मिळतो. पण एसटीडी आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी योग्य निदान आणि उपचारांसाठी आरोग्यसेवा चिकित्सकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मग रोज पिणार ना ऊसाचा रस? (sugarcane juice benefits in pregnancy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.