उन्हाळ्यामध्ये नारळ, लिंबूवर्गीय आंबट फळं, काकडी, टरबूज, कांदे, दही, केळी, पालेभाज्या, पुदिना आणि मासे यांसारखे शरीरासाठी थंड असलेले पदार्थ खाल्ले तर शरीराचं तापमान नियंत्रित राहायला मदत होते. अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांनी भरलेले हे रसभरीत, फायबरयुक्त पदार्थ शरीराचं डिहायड्रेशन होण्यापासून रोखतात. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि उष्णतेशी संबंधित आजारांपासून शरीराचं संरक्षण करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत असा निरोगी आणि सकस आहाराचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश केला तर तुमचं शरीर हायड्रेट राहील. (Summer Diet)
(हेही वाचा – “पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की…” ; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांचे मोठं विधान)
उन्हाळ्यात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे पदार्थ खावेत?
उन्हाळ्यामध्ये पचायला हलके, ताजे आणि हायड्रेटिंग असलेले अन्नपदार्थ खावेत. जसं की,
- टरबूज
- काकडी
- दही
- सॅलड
- ताजी फळं (बेरी, पीच, खरबूज)
- थंडगार हर्बल टी
- पचायला हलके असलेले प्रोटीन पदार्थ (ग्रील्ड चिकन, मासे)
- स्मूदी इत्यादी.
◆उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाण्याचे टाळावेत?
उन्हाळ्यामध्ये शरीरातली उष्णता वाढवणारे किंवा डिहायड्रेशनला कारणीभूत ठरणारे पदार्थ खाणे टाळावेत. जसं की,
- मसालेदार पदार्थ
- तळलेले आणि स्निग्ध पदार्थ
- मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असलेले जड जेवण
- कॅफिनयुक्त पेये
- अल्कोहोलिक पेये
- मीठ जास्त असलेले आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स
- साखर असलेली पेये आणि मिठाई इत्यादी.
उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान थंड ठेवण्यासाठी कोणते १० पदार्थ प्रामुख्याने खावेत?
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचं तापमान थंड राहायला मदत करणारे १० मुख्य पदार्थ पुढीलप्रमाणे…
- टरबूज
- काकडी
- पुदिना
- नारळाचे पाणी
- अननस
- दही
- लिंबूवर्गीय फळं (संत्री, लिंबू इत्यादी)
- पालेभाज्या
- बेरी (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी)
- थंडगार हर्बल टी (पेपरमिंट, कॅमोमाइल) इत्यादी
डिहायड्रेशन रोखण्यासाठी सर्वोत्तम हायड्रेटिंग पदार्थ कोणते आहेत?
उष्ण वातावरणात डिहायड्रेशनला रोखण्यासाठी सर्वोत्तम हायड्रेटिंग पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत…
- टरबूज
- काकडी
- स्ट्रॉबेरी
- कॅनटालूप
- संत्री
- अननस
- सेलेरी
- कोशिंबीर
- टोमॅटो
- बेल पेपर
उन्हाळ्यामध्ये थकवा घालवून शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे चांगले?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शारीरिक थकवा घालवून ताजेतवाने होण्यासाठी पुढील पदार्थ खावेत…
- केळी – पोटॅशियमने समृद्ध असतात.
- बेरी – अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
- काजू आणि नट्स – हेल्दी कोलेस्ट्रॉल आणि प्रोटिन्स प्रदान करतात.
- दही – प्रोटिन्सने समृद्ध असते.
- चिया सिड्स – शाश्वत एनर्जी वाढवतात.
- हिरव्यागार पालेभाज्या – जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असतात.
- लिंबूवर्गीय फळं – व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात.
- स्मूदी – ऊर्जावर्धक अनेक घटक यांत एकत्र असतात.
- क्विनोआ – कार्बोहायड्रेट्स प्रदान करते.
- ताजे, थंड ज्यूस – जीवनसत्त्वं आणि हायड्रेशन प्रदान करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community