summer dresses for women : उन्हाळ्यात महिला वापरु शकतात असे आरामदायी कपडे!

उन्हाळा म्हणजे आऊट डोअर ऍक्टिव्हिटी, आळशी दुपार आणि दिवसभर सूर्यप्रकाश असं समीकरण असतं.

43
summer dresses for women : उन्हाळ्यात महिला वापरु शकतात असे आरामदायी कपडे!

उन्हाळा म्हणजे आऊट डोअर ऍक्टिव्हिटी, आळशी दुपार आणि दिवसभर सूर्यप्रकाश असं समीकरण असतं. या सर्वांचा आनंद घेण्यासाठी स्टायलिश आणि आरामदायी उन्हाळी पोशाख वापरणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उकाड्यामुळे हैराण व्हायला होईल. उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या पडतात त्यामुळे वेकेशनसाठी, विकेंडसाठी किंवा वन-डे पिकनिकसाठी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही कोणते कॅज्युअल कपडे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळी फॅशनची एक उत्तम गोष्ट म्हणजे मॅक्सी ड्रेसेसपासून ते ट्रेंडी क्रॉप टॉप्सपर्यंत, स्टायलिश सँड्रेसपासून ते साध्या टँक टॉप्स आणि स्वीट शॉर्ट्सपर्यंत सगळे कपडे कोणत्याही वयोगटातल्या स्त्रिया वापरू शकतात. (summer dresses for women)

उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावेत? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अजिबात काळजी करू नका. याचं कारण म्हणजे तुमच्याकडे खूप सारे आकर्षक ऑप्शन्स आहेत. जसं की, मॅक्सीपासून मिनीपर्यंत, प्रिंट किंवा सॉलिड, किंवा एम्ब्रॉयडरी आणि सिक्विन्ससह कोणत्याही प्रकारचे कपडे तुम्ही वापरू शकता. (summer dresses for women)

(हेही वाचा – ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे; MP Naresh Mhaske यांची मागणी)

याव्यतिरिक्त रोमपर्स आणि जंपसूट हेही तुम्हाला खूप खूप गोंडस लुक देतात. ते कॅरी करायलाही खूप सोपे आहेत. याशिवाय, उन्हाळ्यात तुमच्याकडे शॉर्ट्सची चांगली जोडी असणंही गरजेचं आहे. तसंच तुम्ही कटऑफपासून ते हाय-वेस्टेड लिनेन नंबरपर्यंत तुमची आवडती स्टाइल निवडू शकता. टॉप्सबद्दल म्हणायचं झालं तर, टँक टॉप नेहमीच स्टाईलमध्ये असतात आणि जर तुम्हाला थोडीशी स्किन एक्स्पोझ करायची असेल, तर तुम्ही क्रॉप टॉप किंवा ऑफ-द-शोल्डर टॉप्स वापरू शकता. (summer dresses for women)

याव्यतिरिक्त शर्ट हा एक बहुमुखी पोशाख आहे. शर्टसाठी पेस्टल शेड्स किंवा फ्लोरल प्रिंटमध्ये कॉटन किंवा लिनेन सारख्या हलक्या वजनाच्या कापडांची निवड करा. कॅज्युअल लूकसाठी तुम्ही शॉर्ट्ससोबत घालू शकता किंवा एखाद्या औपचारिक प्रसंगी ट्राउझर्स किंवा स्कर्टसोबतही घालू शकता. उन्हाळ्यात चमकदार रंग किंवा ग्राफिक प्रिंटमध्ये मऊ कॉटन टी-शर्ट निवडा. कॅज्युअल लूकसाठी शर्टस हाय-वेस्टेड शॉर्ट्स किंवा जीन्ससोबत वापरा. (summer dresses for women)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.