-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला अमेरिकेचा मुक्ती दिन साजरा करताना बहुसंख्य देशांवर तिथून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर आयात शुल्क लादलं. यात भारतावर २६ टक्के इतका कर त्यांनी लादला. म्हणजेच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर तिथे पोहोचल्यावर २६ टक्के इतकं आयात शुल्क द्यावं लागणार आहे. गाड्यांचे सुटे भाग, पोलाद आणि फार्मा कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच हा निकाल जाहीर झाल्यानंतर हा आठवडा संपताना शुक्रवारी फार्मा कंपन्या सगळ्या लाल रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. सन फार्मा कंपनीही याला अपवाद नव्हती. (Sun Pharma Share Price)
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एका दिवसांनी त्यांचे पडसाद जगभरातच सगळीकडे उमटले आणि ट्रम्प यांच्या निर्णयाचा अर्थ जसजसा स्पष्ट होत गेला, तेव्हा बाजारातील भीतीही वाढली. सन फार्मामध्ये एकट्या शुक्रवारी ३.६७ टक्क्यांची घसरण झाली आणि हा शेअर ६५ अंशांच्या घसरणीसह १,७०५ रुपयांवर बंद झाला. सुरुवातीला ट्रम्प यांच्या घोषणेत फार्मा कंपन्यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे गुरुवारी फार्मा कंपन्यांचे शेअर वर आले होते. पण, लगेचच ‘फार्मा कंपन्यांचा आम्ही स्वतंत्र अभ्यास करत आहोत आणि त्यानुसार, या कंपन्यांवरही आयात शुल्क लावलं जाईल,’ असं एक ट्रम्प यांचं भाषणातील विधान व्हायरल झालं आणि फार्मा कंपन्यांवरही घसरणीची गाज कोसळली. (Sun Pharma Share Price)
(हेही वाचा – Ram Navami : इफ्तार आणि ईदला परवानगी आहे, पण राम नवमीला परवानगी नाही; जाधवपूर विद्यापीठात हा कसला नियम ?)
सन फार्माचा शेअर आपला वार्षिक उच्चांक १,९६० च्याही जवळ पोहोचला आहे. पण, तूर्तास शेअरच्या वाटचालीला खिळ बसली आहे. इतकंच नाही तर फार्मा कंपन्यांतील शेअरचं भवितव्य तज्ञांनाही आता धूसर दिसत आहे. भारतीय फार्मा कंपन्यांचा बराचसा व्यापार हा अमेरिकन कंपन्यांशी होतो. सन फार्माही त्यात अग्रेसर आहे आणि तिथेच आयात शुल्क वाढीचा फटका बसणार असल्यामुळे कंपनीच्या पुढील तिमाहीतील कामगिरीवर त्याचा परिणाम जाणवणार आहे. (Sun Pharma Share Price)
शेअर बाजार विश्लेषक आशीष बहेती यांनी फार्मा कंपनीचे शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे. अरविंदो फार्मा आणि सन फार्मा हे दोन्ही शेअर विकण्याचा त्यांचा सल्ला आहे. सन फार्मा १,६४० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असा त्यांचा होरा आहे. (Sun Pharma Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community