-
ऋजुता लुकतुके
१९८३ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता महानगरात दिलीप संघवी यांनी मानसोपचारावरील ५ नवीन औषधं घेऊन एका छोट्या खोलीत एक कंपनी स्थापन केली. त्यांच्याकडे फक्त दोन जणांचा विपणन चमू होता. दारोदारी जाऊन ते आधी मानसोपचारावर औषधं असतात ही मूलभूत गोष्ट लोकांना समजावून सांगायचे. हळू हळू आपल्या कंपनीचा विस्तार करत आगामी १० वर्षांत न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, डायबेटोलॉजी आणि अशा एकूण १२ वैद्यकीय शाखांकडून वापरली जाणारी औषधं कंपनीने बाजारात आणली. त्या जोरावर सन फार्मा अमेरिकेतील भारताची पाचवी मोठी फार्मा कंपनी बनली आहे. आणि जनरिक औषध उत्पादनात कंपनी जगात पाचवी आहे. भारताबाहेर तब्बल १०० देशांमध्ये कंपनीची औषध जातात. (Sun Pharmaceutical LTD)
(हेही वाचा- Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर)
रॅनबॅक्सी कंपनीच्या अधिग्रहणानंतर शेअर बाजारातही कंपनीने मागे वळून पाहिलेलं नाही. कंपनीच्या शेअरने १९९३ पासून शेअर बाजारात सातत्यपूर्ण कामगिरी करत गुंतवणुकदारांना चांगला नफा कमावून दिला आहे. आताही शेअरची किंमत १,८५० रुपयांच्या आसपास आहे. (Sun Pharmaceutical LTD)
चांगले तिमाही निकाल, प्रमोटरनी आपल्याकडे ५४ टक्के हिस्सेदारी ठेवत गुंतवणूकदारांचा मिळवलेला विश्वास आणि फार्मा क्षेत्रात संशोधनावर दिलेला भर यामुळे सनफार्मा कंपनीवर संशोधन संस्थांनीही खरेदीचा सल्ला दिला आहे. बीएनपी पारिबासने या शेअरवर खरेदीचा सल्ला दिला आहे. येत्या १२ महिन्यांत कंपनीचा शेअर २,२६४ रुपयांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. (Sun Pharmaceutical LTD)
(हेही वाचा- ढाक्यातील Pakistan Embassy ठरले धर्मांधांचे केंद्र; हिंदूंविरोधात कट रचून घडवले ३ हजारांहून अधिक हल्ले)
कंपनीच्या तिमाही निकालात महसूल १३,६४५ कोटी रुपयांवर गेलेला दिसतो आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत नफाही ३ टक्क्यांनी वाढला आहे. हे चांगलं लक्षण आहे. तसंच कंपनीचे तीनही प्रमोटर दिलीप संघवी आणि त्यांची दोन मुलं यांचं कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष असतं. त्यांच्याकडे कंपनीची ५४ टक्के मालकी आहे. तर परदेशातून या कंपनीत १८ टक्के गुंतवणूक झाली आहे. या गोष्टी कंपनीच्या वाढीसाठी सकारात्मक असल्याचं लक्षण मानलं जात आहे. (Sun Pharmaceutical LTD)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि वाचकांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. वरील मतं ही संशोधन संस्थांची आहेत. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी – विक्रीवर कोणताही सल्ला देत नाही.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community