Facial Treatment : काळवंडलेल्या त्वचेसाठी सनस्क्रीन हवेच

316
Facial treatment : काळवंडलेल्या त्वचेसाठी सनस्क्रीन हवेच
Facial treatment : काळवंडलेल्या त्वचेसाठी सनस्क्रीन हवेच

बाजारात वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे सनस्क्रीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मोठ्या नामांकित कंपन्याचे सनस्क्रीन वापरल्यास उन्हाच्या तीव्र किरणापासून सुटका होते, असा समज चुकीचा असल्याचे त्वचारोगतज्ञांनी सांगितले. सध्या त्वचा काळवंडल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यासाठी उपचार घेणारे रुग्ण सध्या उपचारांसाठी गर्दी करत असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ म्हणाले. तुमची त्वचा काळवंडलेली असो वा तजेलदार दिवसातून तीनदा सनस्क्रीन लावणे गरजेचे असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ सांगतात.

(हेही वाचा – Covid : कोरोनाचा नवीन विषाणू पसरण्याची शक्यता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा)

त्वचा कळवंडणे हा कोणताही त्वचेशी संबंधित आजार नाही. आजकाल तरुण तरुणीना त्वचा काळवंडणे हा आजार वाटतो. प्रत्यक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्वचा काळवंडणे आवडत नसल्याने तरुण-तरुणी उपचारासाठी येतात. त्यांना फेशियल उपचार दिले जातात, असे त्वचा रोगतज्ज्ञ सांगतात. दोन सेटिंगमध्ये काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार होते.
शरीरातील पाण्याची कमतरता आणि सततच्या उन्हाच्या संपर्कातील प्रवास यामुळे बरेचदा त्वचा डिहायड्रेट आणि कोरडी पडू लागते. त्यात पाण्याऐवजी शीतपेय पिणाऱ्या मंडळीना पोटाच्या समस्या उद्भवतात. पोट साफ नसल्यास उन्हात काळवंडलेली त्वचा अजूनच खराब दिसते. अशातच त्वचेवर उपचार करण्याची बरेचदा गरज असते. ज्यांना अंगात हिट जास्त आहे, त्यांना मात्र बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. अशा रुग्णांनी न चुकता पाणी पीत राहावे, अशी ताकीद डॉक्टरांनी दिली आहे. मात्र घरगुती उपायांनीही त्वचा पूर्वीप्रमाणे टवटवीत होते.

घरगुती फेसपॅक
  • मुलतानीमाती, हळद आणि चंदनाचा फेसपेक लावावा.
  • लिंबू, गुलाब पाणी आणि तांदूळ पावडरचा फेसपेक लावावा.
  • फळांचा रस अधूनमधून लावावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.