आगामी नववर्ष २०२२ मध्ये दोनदा दिसणार सुपरमून!

145

अवघ्या तीन ते चार दिवसांतच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नूतन वर्ष २०२२ ची सुरूवात शुक्रवारी रात्री १२ वाजता होणार असून यंदा १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या आणि १३ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येणार असल्याने आकाशात दोनदा सुपरमून पहायला मिळणार आहे.

यंदा आकाशात उल्कावर्षाव पाहण्याची संधी

पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी २५ ऑक्टोबरचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि ८ नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मात्र ३० एप्रिलचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि १६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. खगोलप्रेमींसाठी २०२२ या नूतन वर्षी ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ऑगस्ट, २२ ऑक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबरच्या रात्री पूर्ण आकाशात उल्कावर्षाव पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

(हेही वाचा – पाच राज्यातील निवडणूकांवर टांगती तलवार, आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत होणार फैसला)

२०२२ हे वर्ष लीपवर्ष नसणार

नव्या वर्षांत एकूण मिळणाऱ्या २४ सुट्यांपैकी श्रीरामनवमी १० एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बकरी ईद जुलै, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, ईद ए-मिलाद ९ ऑक्टोबर आणि ख्रिसमस २५ डिसेंबर अशा एकूण ६ सुट्या रविवारी येत आहेत. तर २०२२ हे वर्ष लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी आहे.

सोनं खरेदीसाठी महत्त्वाचे योग

सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी ३० जून, २८ जुलै आणि २५ ऑगस्ट असे तीन गुरुपुष्यामृत योग आहेत.

९ महिन्यांत विवाह मुहूर्त

गणेशभक्तांसाठी १९ एप्रिल आणि १३ सप्टेंबर रोजी अशा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थी आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने वगळता इतर ९ महिन्यांत विवाह मुहूर्त आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.