सुरत डायमंड बोर्स (SDB) हे जगातील सर्वात मोठे डायमंड ट्रेडिंग हब (हिरे व्यापार केंद्र) आणि ऑफिस बिल्डिंग आहे. हे गुजरातमधील ड्रीम सिटी, सुरत येथे स्थित आहे. ६६०,००० चौरस मीटर (७,१००,००० चौ. हू.) परिसरात पसरलेले आहे. इथे सुमारे ४,२०० कार्यालये आहेत. सध्याचे सुरत डायमंड बोर्सचे अध्यक्ष गोविंद ढोलकिया आहेत आणि सीईओ महेश गढवी आहेत. (surat diamond bourse)
SDB प्रकल्पाचा शुभारंभ गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्प्लेक्स तसेच डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल सिटीच्या बांधकामासाठी पायाभरणी केल्यानंतर करण्यात आला. कॉम्प्लेक्सची एकूण रचना मे २०२२ मध्ये पूर्ण झाली आणि २६ जुलै २०२३ रोजी एकूण बांधकाम पूर्ण झाले. २२ ऑगस्ट २०२३ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे पेंटागॉनला मागे टाकून जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले. (surat diamond bourse)
(हेही वाचा – BMC : महापालिका बांधणार तारांकित हॉटेल, महसूल वाढवण्यासाठी असाही प्रयत्न)
नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते, परंतु काही अंतर्गत कामे प्रलंबित असल्याने त्यास विलंब झाला आणि १७ डिसेंबर २०२३ रोजी उद्घाटन झाले आणि हे केंद्र सर्वांसाठी खुले करण्यात आले. सुरत डायमंड बोर्सचे उद्दिष्ट भारतातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात, निर्यात करणे आणि व्यापाराला चालना देणे असे आहे. या केंद्राद्वारे हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्या संस्थांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रदान केले जाते. (surat diamond bourse)
या इमारतीत कस्टम क्लिअरन्स हाऊस, एक संशोधन संस्था आणि ज्वेलरी मॉलचा समावेश आहे. एकमेकांशी जोडलेल्या ९ टॉवरला प्रत्येकी १४ मजले असून यामध्ये ४,२०० कार्यालये आहेत. हा प्रकल्प उभारण्यासाठी अंदाजे अंदाजे रु. ३,२०० कोटी म्हणजे सुमारे ३८० दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला आहे. (surat diamond bourse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community