Suzuki Burgman Street Electric : भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत सुझुकीचा दणक्यात प्रवेश

सुझुकी बर्गमन स्ट्रीट स्कूटर अलीकडे भारतीय रस्त्यांवर टेस्ट ड्राईव्हसाठी बाहेर पडलेली दिसते. 

343
Suzuki Burgman Street Electric : भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत सुझुकीचा दणक्यात प्रवेश
  • ऋजुता लुकतुके

भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ आता विस्तारतेय. आणि जपानची आघाडीची कंपनी सुझुकी मोटर्सही इथं प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी बर्गमन स्ट्रीट इलेक्ट्रिक ही स्कूटर सप्टेंबरमध्ये लाँच करण्याची तयारी चालवली आहे. मार्च महिन्यातच भारतात होंडा ॲक्टिवा इलेक्ट्रिकही लाँच होणार आहे. आणि सुझुकीची नवीन बाईकही त्याच श्रेणीतील आहे. बर्गमन स्ट्रीट १२५ ही सुझुकीची पेट्रोल इंजिनवर चालणारी स्कूटर आहे. त्याच बाईकचं इलेक्ट्रिक व्हर्जन आता बाजारात येणार आहे. (Suzuki Burgman Street Electric)

गेल्या वर्षभरापासून भारतीय रस्त्यांवर बर्गमन स्ट्रीट इलेक्ट्रिक स्कूटर फिरताना दिसत आहे. त्यावरून गाडीचं डिझाईन आणि लुक आपल्याला समजू शकतो. पेट्रोल इंजिन असलेल्या गाडीच्या आणि या गाडीचा टेल लुक तसाच ठेवण्यात आला आहे. पण, नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन रंग संगती एकत्र करण्यात आल्या आहेत. (Suzuki Burgman Street Electric)

(हेही वाचा – Nothing Phone (2a) : नथिंग फोन (२ए) फोन मार्चमध्ये होणार लाँच )

सुझुकी बर्गमन स्ट्रीट इलेक्ट्रिकची किंमत असेल इतकी 

जी गाडी बघायला मिळाली आहे त्यात पांढऱ्या आणि निळ्याचं मिश्रण आहे. शिवाय फोटोंमध्ये काळ्या आणि राखाडी रंगांचंही मिश्रण दिसत आहे. भारतात ही स्कूटर टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक या स्कूटरशी स्पर्धा करेल. एका चार्जमध्ये ही स्कूटर ६० ते ८० किलोमीटर धावू शकेल. अलीकडच्या आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच या स्कूटरमध्येही ब्लूटूथ यंत्रणा असेल. आणि त्यामुळे स्कूटरचे पॅरामीटर फोनवरही दिसू शकतील. (Suzuki Burgman Street Electric)

सुझुकी बर्गमन स्ट्रीट इलेक्ट्रिकची किंमत १ लाख ते १.२५ लाख रुपयांच्या मध्ये असेल असा अंदाज आहे. आणि कंपनीला इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी अनुदान मिळालं, तर ही किंमतही कमी होऊ शकेल. (Suzuki Burgman Street Electric)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.