-
ऋजुता लुकतुके
स्विगी ही घरपोच अन्नपदार्थ पुरवणारी कंपनी अलीकडेच शेअरबाजारात सूचीबद्ध झाली आहे. आणि आता जागतिक संशोधन संस्थांनीही आपलं लक्ष या शेअरकडे वळवलं आहे. बर्नस्टाईन या प्रसिद्ध संस्थेनं आता ये शेअरची नोंद घेतली आहे. आणि शेअरमधील हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. त्यानंतरचा आपला पहिला निष्कर्ष मांडताना बर्नस्टाईन या शेअरबद्दल सकारात्मक आहे. आणि त्यांनी शेअरला ‘आऊटपरफॉर्म’ असा शेरा मारला आहे. पुढील १२ महिन्यात शेअर ६५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा त्यांचा अंदाज आहे. (Swiggy Share Price)
(हेही वाचा- इस्कॉननंतर आता Maha Kumbh Mela 2025 मध्ये अदाणी समूह गीता प्रेससह सनातन साहित्याचे मोफत वाटप करणार)
स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली तरी शेअर बाजारात पुढील काही वर्ष याच दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा राहील. आणि तिसरी कुठलीही कंपनी यात येणार नसल्यामुळे कंपनीची बाजारातील हिस्सेदारी अबाधित राहील, असं बर्नस्टाईनला वाटतं. २०१४ मध्ये स्विगी ही कंपनी अस्तित्वात आली. आणि फूड डिलिव्हरीबरोबरच आता कंपनी क्विक कॉमर्समध्येही आली आहे. झोमॅटोनंतरची ही देशातील दुसरी मोठी कंपनी आहे. त्याचा लाभ शेअरला मिळेल, असं बर्नस्टाईनचं म्हणणं आहे. या आठवड्यात मात्र या शेअरमध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअऱ ३ टक्क्यांनी घसरून ४९२ रुपयांवर बंद झाला आहे. (Swiggy Share Price)
मागच्या तीन वर्षांत स्विगीची बाजारातील हिस्सेदारी ४ टक्क्यांनी कमी झाली आहे. पण, स्विगी बोल्ट आणि स्विगी लाईट या दोन नवीन उपक्रमांचा फायदा येणाऱ्या दिवसांत कंपनीला मिळेल, असं बर्नस्टाईनला वाटतं. आणि भारतीय बाजारातील हिस्सेदारी ४२ टक्क्यांवर कायम राहील, असा त्यांचा अंदाज आहे. कंपनीचं नफ्याचं प्रमाण हे झोमॅटोप्रमाणेच राहील. म्हणजेच करपूर्व नफ्यात येणाऱ्या वर्षांमध्ये वाढ अपेक्षित असल्याचं बर्नस्टाईनचं म्हणणं आहे. सध्या स्विगीचा करपूर्व नफा १.२ टक्के इतका आहे. तो २०३० पर्यंत चार टक्क्यांवर जाईल असा त्यांचा अंदाज आहे. (Swiggy Share Price)
(हेही वाचा- आरेतील झाडे तोडू नका; Supreme Court ने मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिले आदेश)
भारतातील तसंच परदेशातील एकूण ७ संशोधन संस्थांनी स्विगीच्या शेअर किमतींचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. यातील ४ संस्थांनी स्विगीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर दोघांनी शेअर विकत घेतलेले शेअर कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आणि उर्वरित तीन संस्थांनी विक्रीचा सल्ला दिला आहे. ॲक्सिस कॅपिटल या संशोधन संस्थेनं ६३५ रुपये इतकं लक्ष्य दिलं आहे.
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी – विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community