वाघाच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू, ताडोबातील घटना

86

चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाने आज सकाळी वनरक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. स्वाती ढुमणे असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षकाचं नाव असून या घटनेमुळं वनकर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला ताडोबातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या माया या वाघीणीने केल्याचे सांगितले जात आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. ताडोबातील कोअर क्षेत्रात कोलारा परिक्षेत्रात वन्यप्राणी गणना सुरु होती. या भागांतील ९७ पाणवठ्यावर ट्रांसेक्ट लाईन टाकण्याचे काम ढोमणे करत असताना वाघाने हल्ला चढवला. त्यांना फरफडत नेले.

(हेहे वाचा – शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य भिकेत मिळालं नाही, राऊतांचा कंगनासह भाजपला टोला)

कसा झाला हल्ला ?

कोलारा या कोअर एरियात स्वाती ढोमणेंसह अन्य तीन वनमजूर ट्रान्झिट लाईन लावायला गेले होते. त्यावेळी चौघांनाही माया वाघीण दिसली. त्यांनी माया ज्या मार्गावर दिसली तो मार्ग बदलून अन्य मार्गातून जाणं पसंत केलं. घनदाट मार्गातून माया अचानक समोर आली आणि तिनं स्वाती ढोमणेंना फरफटत नेलं.

भारतात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते. या व्याघ्रगणनेसाठी आवश्यक ट्रान्झिटलाईनच्या कामासाठी स्वाती ढोमणे तीनजणांसह गेल्या होत्या. त्यांनी २०० मीटरवरुन वाघाला पाहिले. त्यामुळे टीम जागेवरच दीड तास थांबली. मार्ग बदलत जाताना तीन जणांच्या मागून चालणार्‍या स्वाती ढुमणे यांना वाघीणीने फरफडत नेलं. ढुमणे यांचा मृतदेह वनकर्मचार्‍यांनी शोधला. शवविच्छेदनासाठी चिमर रूग्णालयात मृतदेह पाठवलाय. स्वाती ढोमणे यांच्या कुटुंबीयांना वनविभागाचं सहकार्य आहे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाते वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक, डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

ट्रान्झिट लाईनचं काम थांबवलं

या घटनेनंतर वनविभागाने ट्रान्झिट लाईन लावण्याचं काम तातडीनं थांबवलं आहे. ताडोबाच्या वनाधिकार्‍यांची टीम नुकतीच घटनास्थळाहून बाहेर निघाली आहे. या हल्ल्यानंतरही माया वनाधिकार्‍यांना दिसली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.