उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी? ‘या’ पेयाचा करा आहारात समावेश, जाणून घ्या फायदे

128

मुंबईसह संपूर्ण देशाभरातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होत आहेत. येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्यात मुख्यत: अनेक जणांना डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्हाला उन्हाळ्यात हेल्दी आणि हायड्रेटेड रहायचे असेल तर तुम्ही एका नव्या पेयाचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. उन्हाळ्यात काकडीचे सेवन करणे खूप फायदेशीर समजले जाते यामुळेच आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या-वेगळ्या रेसिपीविषयी माहिती देणार आहोत, काकडीच्या ताकाविषयी तुम्ही ऐकून आहात का? या पेयाचे फायदे काय आहेत आणि हे ताक कसे बनवावे जाणून घेऊया…

( हेही वाचा : बाबरीच्या वक्तव्यावरून मनसेही आक्रमक! ट्विटरवर शेअर केला राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ)

काकडीचे फायदे

  • रक्तातील साखर कमी करते
  • वजन कमी करण्यात मदत करते
  • हायड्रेशनला प्रोत्साहन देते

हे आहेत काकडीच्या ताकाचे फायदे …

  • कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते
  • रक्तदाब नियंत्रण
  • हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते

पण जर काकडी आणि ताक यांना एकत्र केलं तर? सध्या अशीच एक रेसिपी नेटकऱ्यांना आवडू लागली आहे. काकडीचे ताक बनवण्यासाठी या गोष्टी लागतील…

  • १ काकडी
  • २ मिरच्या
  • ५०० मिली ताक
  • १/२ चमचा काळं मीठ
  • १/२ चमचा मीठ
  • १/२ चमचा जिऱ्याची पावडर
  • पुदीन्याची पानं
  • बर्फ

काय आहे रेसिपी ..

  • काकडीची सालं काढून घ्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
  • या तुकड्यांना मिक्सरमध्ये टाका.
  • त्यात मिरची बारीक चिरून टाका.
  • याचे एक मिश्रण तयार होईल.
  • मातीच्या भांड्यात ताक घ्या.
  • तयार झालेल्या त्या मिश्रणातून एक चमचा ताकाच्या भांड्यात टाका.
  • चवीनुसार १/२ चमचा काळं मीठ, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा जिऱ्याची पावडर टाका.
  • पुदीन्याची काही पानं टाका.
  • ताक घुसळून घ्या.
  • आवडत्या ग्लासमध्ये सर्व्ह घ्या.
  • उन्हात थंडावा देणारे आरोग्यादायी काकडीचे ताक तयार!

(आरोग्या संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्यावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.