उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

99

सध्या राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला असून मुंबईकर या गरमीमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. उन्हाळयात प्रामुख्याने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. या दिवसात अनेकांना बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, पोटाचे विकार होतात. यामुळेच उन्हाळ्यात बाहेर गाडीवर मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करताना सावध रहा. आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करून ताजे आणि घरी शिजवलेले अन्नाचे सेवन करा.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? तर करा हे उपाय )

उन्हाळ्यात या पदार्थांच्या सेवनापासून दूर रहा….

मसाले :-
अनेकांना खूप तेलकट-मसालेदार पदार्थ खायला आवडतात. उन्हाळ्यात मसालेदार अन्न आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यात मिरची, आले, काळी मिरी, जिरे आणि दालचिनी असल्याने शरीरातील उष्णता वाढते.

New Project 2 12

तेलकट आणि जंक फूड:-
जास्त तेलकट आणि जंक फूड खाणे टाळा. तेलकट आणि जंक फूडमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी, चरबी इत्यादी वाढते. त्यांचे सतत सेवन केल्याने तुमचे पोट खराब होईल आणि अन्न विषबाधा (food poisoning) देखील होऊ शकते.

New Project 3 10

चहा आणि कॉफी :-
बरेच लोक आहेत जे उन्हाळ्याच्या दिवसातही ऑफिसमध्ये बसून सतत चहा-कॉफी पितात. असे केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामध्ये असलेल्या कॅफिन आणि साखरेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. उन्हाळ्यात निरोगी राहायचे असेल तर चहा आणि कॉफीचे अतिसेवन करणे टाळावे.

New Project 4 9

मांस आणि मासे यांचे अतिसेवन :-
मांसाहाराचा अतिरेक देखील या ऋतूत चांगला नाही. जर तुम्हाला ग्रेव्ही फिश, रेड मीट, तंदूरी चिकन किंवा सीफूड खायला आवडत असेल तर या दिवसात महिन्यातून एकदा किंवा दोनदाच मांसाहार खाणे चांगले असते. यामुळे पचनशक्तीवर परिणाम होणार नाही.

New Project 5 9

चीज, सॉसचे सेवन करू नये :-
उन्हाळ्यात चीज, सॉसचे सेवन करू नये. काही सॉसमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी चांगले नसते. घरची चटणी खाणे चांगले. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आवळा, हिरवी मिरची यापासून बनवलेली चटणी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

New Project 6 7

आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स :-
हे थंड पदार्थ असले तरी ते शरीराला गरम करणारे पदार्थ आहेत. उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.