आरोग्य विमा घेताय? ‘हे’ लक्षात असू द्या

अनेक जणांना असे वाटते की, वैद्यकीय गरज लागेल तेव्हा आरोग्य विमा काढून घेऊ आणि विम्याची रक्कमही ऐनवेळी वाढवून घेऊ, पण आरोग्य विमा पाहिजे तेव्हा खरेदी करता येत नाही.

हे लक्षात असू द्या

बहुतांश लोक 5 ते 10 लाख रुपयांचे कव्हर असलेला आरोग्य विमा खरेदी करतात. तथापि, आज उपचारासाठी 5 लाख रुपयांची गरज असलेल्या आजारावर 20 वर्षांनी 15 लाखांचा खर्च होऊ शकतो. त्यामुळे अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा घ्या.

जोखिमेवर लक्ष द्या

विमा घेताना भविष्यातील जोखिमेवर लक्ष असू द्या. अचानक येणारा आजार, कमवत्या सदस्यांचा मृत्यू, मुलांची शिक्षणे, लग्न यांचा विचार करुन पाॅलिसी घ्या.

( हेही वाचा: Second Hand कार खरेदी करताना आता होणार नाही फसवणूक; सरकार उचलणार ‘हे’ पाऊल )

आयसीयूचा खर्च

अनेक कंपन्या आयसीयूच्या खर्चावर मर्यादा लादतात. त्यामुळे संपूर्ण उपचाराचा खर्च देणा-या पाॅलिसीचीच निवड करा. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणा-या प्रत्येक खर्चाला पाॅलिसीत कव्हर असायला हवे. अनेक कंपन्या रुग्णालयातील खोली भाडे तसेच नर्सिंगच्या खर्चाला कव्हरच्या कक्षेत धरत नाहीत. पाॅलिसी घेताना ही बाब नीट पाहून घ्या, अशी पाॅलिसी घेण्याचे टाळा.

असे निवडा योग्य आरोग्य विमा प्लॅन

  • फॅमिली फ्लोटर- यात एकाच प्लॅनमध्ये परिवारातील सर्व सदस्यांना कव्हर मिळते. मात्र, कव्हर तपासून घ्या. कारण अनेक प्लॅनमध्ये केवळ पती-पत्नी व मुले किंवा पालक व आजी- आजोबा यांनाच कव्हर असते. अशा अंशत: कौटुंबिक कव्हर असलेली पाॅलिसी टाळून संपूर्ण परिवाराला कव्हर असलेल्या पाॅलिसीला प्राधान्य द्या.
  • वैयक्तिक प्लॅन- आपला वैद्यकीय इतिहास पाहूनच हा प्लॅन घ्या. कॅसलेस सुविधा पाॅलिसीत कॅशलेस कव्हर आहे की नाही, हे तपासून घ्या.
  • कॅशलेस सुविधा -असलेलीच पाॅलिसी घ्या. तसेच त्यात काय काय कॅशलेस आहे, हे सुद्धा पाहून घ्या…

सेटलमेंट रेशो

कंपनीचा सेटलमेंट रेशो उच्च आहे की निन्म हे तपासून घ्या. उच्च सेटलमेंट रेशो असलेल्या कंपन्यांची पाॅलिसी घेण्यास प्राधान्य द्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here