-
ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या ऑटोएक्स्पोमध्ये टाटा मोटर्सनी पहिल्यांदा अल्ट्रोझ रेसर कार (Tata Altroz Racer) लोकांसमोर आणली. तिचा स्पोर्टी लूक आणि झाकपाक डिझाईन तेव्हाच जाणकारांना आवडलं होतं. आणि लवकरच ही कार लाँच करू असं कंपनीने म्हटलं होतं.
ती वेळ आता आलीय. आणि टाटा अल्ट्रोझ रेसर कार (Tata Altroz Racer) भारतीय रस्त्यावर धावण्यासाठी तयार आहे. या गाडीत १.२ लीटर पेट्रोल टर्बो इंजिन आहे. यातून १२० पीएस आणि १७० एलएम इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. नेक्सॉन मॉडेलच्या जवळ जाणारं असं हे इंजिन आहे. फक्त यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मोड नाही, जो नेक्सॉनला आहे. आल्ट्रोझमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन शक्य आहे. ही गाडी अर्थातच पेट्रोलवर चालेल. टाटा अल्ट्रोझ रेसर गाडीचं (Tata Altroz Racer) बुकिंग आता सुरू झालं आहे. आणि लगेचच ही गाडी रस्त्यांवरही दिसू लागेल.
रेसर कार असलेल्या या गाडीचा लूक आणि डिझाईन मात्र आकर्षक आहे. टाटा मोटर्सच्या ट्विटर हँडलवर तिचा व्हीडिओ तुम्ही पाहू शकता.
(हेही वाचा – Bhiwandi येथे डायपर बनवणाऱ्या कंपनीला आग; जीवितहानी नाही)
Here is the Tata Altroz Racer in action from the new CoASTT high performance track! Check out interior pictures below.
Also we will be getting you a detailed walkaround of this Altroz Racer later this week on the 14th of June. @TataMotors_Cars pic.twitter.com/VxLf59AQiA
— MotorOctane (@MotorOctane) June 10, 2024
(हेही वाचा – Murlidhar Mohol on Supriya sule : ताईंची मळमळ बाहेर आली; मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला)
या गाडीचं इंटिरिअर इतर टाटाच्या गाड्यांपेक्षा आधुनिक आहे. आल्ट्रोझ रेसर कारचा डिजिटल डिस्प्ले मोठा आणि कारटेकशी जोडलेला आहे. गाडीची इतर माहितीही डिजिटल स्क्रीनवरच पाहता येते. गाडीला क्रूझ कंट्रोल आहे. आतील लायटिंग चांगलं आहे. आणि छताला सनरूफही आहे. ९.४९ लाखांपासून या गाडीची किंमत सुरू होते. गाडीचे आर १, आर २ आणि आर ३ असे तीन व्हेरियंट आहेत.
फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार ही या श्रेणीतील स्पोर्टी लुक आणि फिचर असलेली कार सध्या भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळते. आणि ही कार लोकप्रियही आहे. पण, आता अल्ट्रोझची मोठी स्पर्धा पोलोला असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community