Tata Motors च्या ‘ऑटोमोटिव्ह स्किल लॅब्स’ उपक्रमातून ४००० विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण

एका उज्ज्वल ऑटोमोटिव्ह भविष्यासाठी वंचित समाजातील तरूणांचे सक्षमीकरण, ३० टक्के मुलींच्या नोंदणीतून लिंगसमावेशक दृष्टीकोनावर भर

158
Tata Motors च्या ‘ऑटोमोटिव्ह स्किल लॅब्स’ उपक्रमातून ४००० विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण

ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी टॅलेंटप्रति आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या निर्मितीप्रति वचनबद्धतेचा पुनरूच्चार करताना टाटा मोटर्सने नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) च्या सहयोगाने जवाहर नवोदय विद्यालयांची (जेएनव्ही)मध्ये ‘ऑटोमोटिव्ह स्किल्स लॅब्स’ स्थापित केल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निवडक जेएनव्हीमध्ये अत्यावश्यक साहित्यासह २५ प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या आहेत. या उद्योग आणि शिक्षणक्षेत्रासाठीचा संयुक्त विद्यम दर वर्षी सुमारे ४०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑटोमोटिव्ह कौशल्यांनी सज्ज करतो आणि त्यातील ३० टक्के मुली असतात. (Tata Motors)

‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०’ मधील व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित क्षेत्राला अनुसरून टाटा मोटर्सच्या ‘ऑटोमोटिव्ह स्किल्स लॅब्स’ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना (९ वी ते १२ या वर्गातील विद्यार्थ्यांना) विषयांचे आवश्यक ते ज्ञान, प्रत्यक्ष कौशल्ये आणि मौल्यवान उद्योगात सहयोग या सर्व गोष्टी शालेय संकुलात देतात. त्याचबरोबर विद्यार्थी टाटा मोटर्सच्या कारखान्यांना भेट देऊ शकतात, सेवा आणि डीलरशिप व्यावसायिकांशी संवाद साधू शकतात आणि खऱ्या जगातील ज्ञान मिळवून त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी उद्योगातील तज्ञांची लेक्चर्स अटेंड करू शकतात. याशिवाय, या प्रयोगशाळांमध्ये शिकवणारे शिक्षक कंपनीच्या कारखान्यांमध्ये आवश्यक ते प्रशिक्षण प्राप्त केलेले असतात. पुण्यातील स्किल लॅबमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ई-रिक्षा हा सर्वसमावेशक अध्ययन अनुभवाचे प्रतीक आहे. (Tata Motors)

(हेही वाचा – दिल्लीच्या delhi sarai rohilla railway station बद्दल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या एका क्लिक वर)

अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स आणि एनव्हीएस यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्रे मिळू शकतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदविकेचा पर्याय निवडू शकतात, ज्यात टाटा मोटर्सच्या उत्पादन सुविधांमध्ये पूर्ण स्टायपेंड आणि ऑन दि जॉब ट्रेनिंगचा समावेश आहे. त्याचबरोबर, टाटा मोटर्ससोबत काम सुरू ठेवू इच्छिणाऱ्यांना निवडक अभियांत्रिकी संस्थामध्ये ३.५ वर्षांचा कार्यकारी शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करता येईल आणि पाच वर्षांनंतर त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळू शकेल. (Tata Motors)

तरूणांचे आयुष्य समृद्ध करून ऑटोमोटिव्ह उद्योगातील कौशल्याची तरी सांधण्याबाबत वचनबद्धतेवर भर देताना टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले की, “आमची ऑटोमोटिव्ह स्किल लॅब्स वंचित समुदायातील तरूणांना बदलत्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी सुसंगत असलेल्या रोजगारक्षम कौशल्यांनी सक्षम करतात. त्यातून ९वी ते १२ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण मिळवणे आणि रोजगाराच्या संधी सुरक्षित करणे शक्य होते. हा अभ्यासक्रम ‘स्किल इंडिया मिशन’मध्ये योगदान देताना विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, उद्योजकता कौशल्ये, विश्लेषणात्मक दृष्टीकोन आणि महत्त्वाची संवाद कौशल्ये रूजवतो. विद्यार्थिनींकडून आलेल्या प्रतिसादामुळे विकसित भारत @ २०४७ या स्वप्नानुसार जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढवण्यासाठी योगदान देणाऱ्या भविष्यातील लीडर्सचे मजबूतीकरण करण्याच्या आमच्या वचनाला बळ मिळाले आहे.” या अभ्यासक्रमातील १६०० विद्यार्थ्यांनी २०२३ साली ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलमेंट कौन्सिल (एएसडीसी)कडून आयोजित नॅशनल ऑटोमोबाइल ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला. त्यातील १७ विद्यार्थी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचण्यात यशस्वी ठरले. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.