Tata Motors ‘नेक्‍सॉन’ आणि ‘पंच’सह एसयूव्‍ही बाजारपेठेत अग्रस्‍थानी

68
Tata Motors ‘नेक्‍सॉन’ आणि ‘पंच’सह एसयूव्‍ही बाजारपेठेत अग्रस्‍थानी

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष २४ चा शेवट उत्‍साहात केला, जेथे कंपनीची दोन उत्‍पादने पंच आणि नेक्‍सॉन देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्‍ही ठरल्‍या. टाटा नेक्‍सॉनने विभागात तगडी स्‍पर्धा असताना देखील सलग तीन वर्ष या विभागातील आपले अग्रस्‍थान कायम राखले, तर पंच दुसऱ्या क्रमांची एसयूव्‍ही ठरली. टाटा नेक्‍सॉनने नुकतेच आपल्‍या ७व्‍या वर्षामध्‍ये ७ लाख विक्रीचा मोठा टप्‍पा गाठला, ज्‍यामुळे भारतातील ती सर्वात लोकप्रिय एसयूव्‍ही ठरली आहे. (Tata Motors)

कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागाने वर्षानुवर्षे उल्‍लेखनीय वाढ दाखवली आहे, ज्‍यामुळे हा सर्वात स्‍पर्धात्‍मक विभाग ठरला आहे. टाटा मोटर्स या क्षेत्रात प्रमुख असण्‍याप्रती कटिबद्ध आहे. नेक्‍सॉन आणि पंचसाठी विविध इनोव्‍हेशन्‍समधील कंपनीच्‍या सतत गुंतवणूकीमधून ही कटिबद्धता दिसून येते. (Tata Motors)

नेक्‍सॉन बाबत :

२०१७ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून नेक्‍सॉनने अद्वितीयता व अनोख्‍या वैशिष्‍ट्यांनी युक्‍त व उच्‍चस्‍तरीय कार्यक्षमता व आरामदायीपणा देणाऱ्या वेईकल्‍सचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेक्‍सॉनची भावी डिझाइन, उच्‍च दर्जाची सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि सातत्‍यपूर्ण विकासाने या वेईकलला भारतीय ग्राहकांमध्‍ये लोकप्रिय बनवले आहे, तसेच विश्‍वसनीयतेसाठी प्रतिष्‍ठा प्राप्‍त केली आहे. नेक्‍सॉन २०१८ मध्‍ये भारतातील पहिली जीएनसीएपी ५-स्‍टार रेटेड वेईकल होती, जिने भारतीय ऑटोमोबाइल्‍सकरिता फॉलो करावा असा बेंचमार्क स्‍थापित केला. हा वारसा तेव्‍हापासून कायम आहे. फेब्रुवारी २०२४ मध्‍ये न्‍यू जनरेशन नेक्‍सॉनला सुधारित २०२२ प्रोटोकॉलनुसार जीएनसीएपी ५-स्‍टार रेटिंग मिळाले, ज्‍यानंतर लवकरच Nexon.ev ला याच महिन्‍यामध्‍ये भारत-एनसीएपीकडून प्रतिष्ठित ५-स्‍टार रेटिंग मिळाले. (Tata Motors)

४१ प्रतिष्ठित पुरस्‍कारांची विजेती आणि भारतातील रस्‍त्‍यांवर ७ लाख नेक्‍सॉन्‍स धावत असल्‍यास या उत्तम कामगिरीमधून या वेईकलची वाढती विक्री दिसून येते, जेथे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये (२०२२ व २०२३) ३ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रिक या विविध पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध ब्रँड नेक्‍सॉन काळासह अधिक प्रबळ झाला आहे आणि वेईकलची दर्जात्‍मक डिझाइन, विभागातील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये व टेक फॉरवर्ड अनुभवासह निष्‍ठावान चाहतावर्ग स्‍थापित केला आहे. (Tata Motors)

(हेही वाचा – Kisan Sabha: दूध उत्पादकांचे शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन, काय आहेत मागण्या ? वाचा सविस्तर)

पंच बाबत :

दुसरीकडे, टाटा पंचने एसयूव्‍ही पैलूंचे लोकशाहीकरण केले आहे. या वेईकलची तडजोड न करणारी डिझाइन, आरामदायीपणा व प्रमाणित क्षमतेने विद्यमान व पहिल्‍यांदाच वेईकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एसयूव्‍ही दर्जा, एैसपैस इंटीरिअर्स आणि तिच्‍या विभागामध्‍ये सर्वोच्‍च सुरक्षितता रेटिंग (जीएनसीएपी ५-स्‍टार रेटेड) देणारी पंच निश्चितच सर्वसमावेशक पॅकेज आहे. तसेच, Punch.ev ला नुकतेच ५-स्‍टार बीएनसीएपी रेटिंग मिळाले, जी भारतातील सर्वात सुरक्षित वेईकल ठरली आहे. एकूण, पंच सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १७०,०७६ युनिट्सची विक्री झाली, ज्‍यामुळे बाजारपेठेतील या वेईकलचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे. मार्च २०२४ पर्यंत पंच उद्योगामधील पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. (Tata Motors)

भारतातील कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही बाजारपेठेत गेल्‍या काही वर्षांमध्‍ये मोठी वाढ झाली आहे, ज्‍याचे श्रेय मार्केट शेअरमधील स्थिर वाढीला जाते. या विभागांतर्गत उद्योगाने मार्केट शेअरमध्‍ये ४ टक्‍क्‍यांवरून ७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे, तर सर्वात मोठ्या एसयूव्‍ही बाजारपेठेत मार्केट शेअर ८ टक्‍क्‍यांवरून १४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. या वाढीमधून ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रात कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हींची वाढती मागणी व अपील दिसून येते, ज्‍यामुळे उद्योगामधील अग्रणी म्‍हणून त्‍यांच्‍या स्‍थानाची खात्री मिळते. (Tata Motors)

ठळक वैशिष्‍ट्ये :

• नेक्‍सॉन सलग तीन वर्षांसाठी पहिल्‍या क्रमांकाची एसयूव्‍ही ठरली. (आर्थिक वर्ष २४ पर्यंत)
• नेक्‍सॉन साजरा करत आहे ७ लाख विक्रीचा टप्‍पा आणि ७वा वर्धापन दिन.
• नेक्‍सॉन आणि पंच आर्थिक वर्ष २४ साठी एसयूव्‍ही श्रेणीमधील अनुक्रमे पहिल्‍या व दुसऱ्या क्रमांकाच्‍या एसयूव्‍ही ठरल्‍या.
• पंच मार्च व एप्रिल २०२४ मध्‍ये पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली.
• Nexon.ev आणि Punch.ev ५-स्‍टार बीएनसीएपी रेटिंग प्राप्‍त करणाऱ्या पहिल्‍या ईव्‍ही ठरल्‍या, तसेच Punch.ev भारतातील सर्वात सुरक्षित ईव्‍ही ठरली. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.