ग्रामीण बाजारपेठेत Tata Motors पॅसेंजर वेईकल्‍सच्‍या विक्रीमध्‍ये ५ वर्षांत ४ पट वाढ

आर्थिक वर्ष २४ मधील टाटा पॅसेंजर वेईकल विक्रीमध्‍ये ४० टक्‍क्‍यांचे योगदान

180
Tata Motors आणि मॅजेंटा मोबिलिटी यासंदर्भात अग्रस्‍थानी

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ग्रामीण क्षेत्रांतील विक्रीत प्रभावी कामगिरी केली, जेथे कंपनीच्‍या एकूण पॅसेंजर वेईकल्‍स विक्रीत ४० टक्‍क्‍यांचे योगदान दिले. टाटा मोटर्सच्‍या कार्स व एसयूव्‍हींच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीची लोकप्रियता ग्रामीण ग्राहकांमध्‍ये देखील वाढली आहे, ज्‍यामध्‍ये ७० टक्‍के ग्राहक पहिल्‍यांदाच कार खरेदीदार आहेत. वाढत्‍या पायाभूत सुविधा, डिजिटल उपलब्‍धता आणि खरेदी क्षमतेसह ग्रामीण व शहरी ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षांमधील तफावत कमी होत आहे. (Tata Motors)

विभागीय परिवर्तन :
  • टाटा कार्स व एसयूव्‍ही ऑफरिंग्‍जची प्रबळ न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणी विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये (पेट्रोल, डिझेल, सीएनजी व ईव्‍ही) उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजांशी अनुकूल उत्तम पर्यायाची निवड करण्‍याची सुविधा मिळते.
  • ग्रामीण बाजारपेठेत टाटा एसयूव्‍ही विक्री ३५ टक्‍क्‍यांवरून ७० टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे.
  • पर्यायी इंधन (सीएनजी + ईव्‍ही) विक्री आर्थिक वर्ष २२ मधील ५ टक्‍क्‍यांवरून आर्थिक वर्ष २४ मध्‍ये २३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे.
  • नाविन्‍यपूर्ण ट्विन-सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञानामध्‍ये वाढ होत आहे, ग्रामीण बाजारपेठांमध्‍ये १६ टक्‍के सीएनजी उपलब्‍ध आहे.
  •  ग्रामीण भागांमधील ग्राहकांची मागणी एमटीवरून एएमटी/एटीमध्‍ये बदलत आहे. गेल्‍या आर्थिक वर्षाच्‍या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनच्‍या प्रमाणात १४ टक्‍के वाढ दिसण्‍यात आली आहे. (Tata Motors)

(हेही वाचा – Delhi CM Arvind Kejriwal यांना जामीन देण्यास नकार; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ)

विकासासाठी प्रेरणास्रोत : 

  • टाटा मोटर्सने (Tata Motors) राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या नेटवर्कमध्‍ये वाढ केली आहे, जेथे विविध ठिकाणी ८५० हून अधिक ग्रामीण आऊटलेट्स (आर्थिक वर्ष २१ मध्‍ये ५१७), तसेच ग्रामीण भागांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी २६० वर्कशॉप्‍स आहेत.
  • नेटवर्क कृतींना १३५ अनुभव व्‍हॅन्‍सचे (आर्थिक वर्ष २१ मध्‍ये ३५ व्‍हॅन्‍स) पाठबळ आहे, ज्‍या मोबाइल शोरूम्‍स म्‍हणून सेवा देतात. या व्‍हॅन्‍समध्‍ये ऑडिओ व व्हिडिओ सुविधा आहे, ज्‍या विद्यमान व भावी ग्राहकांना माहिती प्रसारित यंत्रणा म्‍हणून कार्यक्षमपणे कार्य करतात, ज्‍यामुळे टाटा मोटर्सचे आऊटलेट नसलेल्‍या भागांमध्‍ये पोहोचण्‍यास मदत होते.
  • याव्‍यतिरिक्‍त, कंपनी ईजीसर्व्‍हच्‍या रूपात उपलब्‍ध असलेली घरपोच सेवा देते, जी तक्रारीचे त्‍वरित निराकरण करण्‍यास मदत करते.
  • कंपनी ग्राहकांना नाविन्‍यपूर्ण आर्थिक योजनांसह पाठिंबा देत आहे. राष्‍ट्रीयकृत बँकांच्‍या तुलनेत गावांमध्‍ये सखोल नेटवर्क्‍स असलेल्‍या बँकासोबत सहयोग केला आहे, तसेच कंपनीने अधिककरून स्‍थानिक व्‍यक्‍तींसाठी अनुकूल योजना सादर केल्‍या आहेत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांसाठी कापणीच्‍या हंगामानुसार ६ मासिक ईएमआय योजना.
  • बाजारपेठ क्रियाकलाप-रोडशोज, सेल्‍स मीलास, सर्विस कॅम्‍प्‍स आणि समुदाय-केंद्रित वर्कशॉप्‍स या सर्वांचा ग्रामीण भागांमधील विद्यमान व संभाव्‍य ग्राहकांसोबत कनेक्‍ट होण्‍याचा मनसुबा आहे.
  • तसेच, कंपनी आपली पोहोच वाढवण्‍यासाठी आणि ग्राहकांच्‍या गरजांबाबत सखोलपणे जाणून घेण्‍यासाठी स्‍थानिक प्रभावकांसोबत सहयोगाने काम करते, जसे सरपंच, व्‍हीएलई-नेटवर्क ऑपु व्हिलेज लेव्‍हल आंत्रेप्रीन्‍युअर्स आणि सीएससी-कॉमन सर्विस सेंटर्स (या सरकार संचालित संस्‍था आहेत, ज्‍या त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या मालकीच्‍या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उत्‍पादनांची विक्री करतात). (Tata Motors)

टाटा मोटर्सच्‍या (Tata Motors) कार्स व एसयूव्‍हींच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीने विशेषत: ग्रामीण ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या श्रेणीमध्‍ये भावी डिझाइन, उत्‍साहवर्धक कार्यक्षमता आणि अनेक प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत. टाटा मोटर्स भारतातील ग्रामीण भागांमधील यशाचे श्रेय त्‍यांची नाविन्‍यपूर्ण वेईकल्‍स आणि ग्रामीण ग्राहकांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांबाबत असलेल्‍या माहितीला जाते. ग्रामीण बाजारपेठांच्‍या व्‍यापक क्षमता आणि ग्रामीण बाजारपेठा प्रदान करणाऱ्या संधींचा फायदा घेत टाटा मोटर्सचा आपले स्‍थान दृढ करण्‍याचा, तसेच बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्‍याचा मनसुबा आहे. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.