Tata Power Share Price : चांगल्या तिमाही निकालांनंतर टाटा पॉवर शेअरमध्ये तेजीचं वातावरण

Tata Power Share Price : सौरऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारावर कंपनी लक्ष केंद्रीत करणार आहे. 

63
Tata Power Share Price : चांगल्या तिमाही निकालांनंतर टाटा पॉवर शेअरमध्ये तेजीचं वातावरण
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एकूणच ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची चलती आहे आणि त्यातच टाटा पॉवर कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल नोंदवल्यामुळे गेल्या आठवड्याभरात या शेअरमध्ये खरेदीचं वातावरण आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १०.३५ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. कर भरणा झाल्यानंतरचा नफाही ३,९०९ कोटी रुपयांचा आहे. इतकंच नाही तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही कंपनीने भरीव कामगिरी केली आहे. (Tata Power Share Price)

डिसेंबर तिमाहीनंतर कंपनीची सौरऊर्जा क्षमता ६.७ गिगावॅट्सची आहे आणि या प्रकल्पातून ११,७०० एमयु इतकी ऊर्जा निर्मिती होत आहे. १० गिगावॅट क्षमतेचे आणखी काही प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीची पर्यावरणपूरक ऊर्जा क्षणता १६.७ गिगावॅटवर जाणार आहे. या कामगिरीमुळे कंपनीच्या शेअरलाही गुंतवणूकदारांकडून मागणी आहे. (Tata Power Share Price)

(हेही वाचा – नवी मुंबई शहर बनले Drugs चे ‘हब’; एनसीबीच्या कारवाईत २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त)

New Project 2025 02 08T172217.976

कंपनीने अलीकडेच तामिळनाडू इथं ‘घर घर सोलार’ असा अभिनव प्रकल्प राबवला होता. त्यानुसार, छतावर छोटेखानी सौरऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी कंपनी पुढाकार घेणार आहे आणि एकट्या तामिळनाडूत असे प्रकल्प उभे राहिल्यानंतर कंपनीने ओडिशा, राजस्थान, केरळ आणि छत्तीसगड इतं छतावरील प्रकल्प उभे करण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आणि असे देशभरात २.५ गिगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कंपनीने आतापर्यंत उभे केले आहेत. (Tata Power Share Price)

२०३० पर्यंत देशभरात ३० लाख सौरऊर्जा एककं उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. शिवाय कंपनीने १,२०,००० घरांमध्ये ई-वाहनांसाठीचे चार्जर बसवले असून १,११५ ई-बस चार्जिंग युनिट बसवली आहेत. ही सकारात्मकता कंपनीच्या शेअरमध्येही दिसून येत आहे. मागच्या पाच दिवसांतच शेअरमध्ये २.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Tata Power Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.