Alert! तुमच्या मोबाईलमध्ये हे 13 Apps आहेत, तर लगेच Delete करा; अन्यथा…

140

आजच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकजण वापरत असणार यात काही शंका नाही. तसेच त्या प्रत्येकाच्या फोनमध्ये अनेक अॅप्स देखील असतील. यामध्ये अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात, म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अॅप्सला हॅकिंगचे साधन बनवतात आणि नंतर त्यांच्याकडून स्मार्टफोन्समध्ये सहज एन्ट्री करतात.

(हेही वाचा – Yes Bank-DHFL Case: संजय छाब्रियांसह अविनाश भोसलेंची ४१५ कोटींची संपत्ती ED कडून जप्त)

असेच काही धोकादायक स्मार्टफोन अॅप्स आहेत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करता कामा नये आणि जर ते तुम्ही डाउनलोड केले असतील तर तुम्ही ते लगेच डिलीट करा, अन्यथा त्याचा मोठा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एक धोकादायक Android मालवेअरचा धोका पसरला असून हजारो Android स्मार्टफोन युजर्सना त्याचा सर्वाधिक धोका आहे. या धोक्यामुळे अनेक गुगल प्ले स्टोअर अॅप्स धोकादायक असल्याचे सांगण्यात आले असून ते डाउनलोड केल्याने युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.

हे अॅप्स त्वरीत करा डिलीट

असे काही 13 अॅप्स आहेत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करू नये आणि जर तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स डाउनलोड केले असतील तर ते लगेच डिलीट करा. junk Cleaner, EasyCleaner, Power Doctor, Super Clean, Full Clean -Clean Cache, Fingertip Cleaner, Quick Cleaner, Keep Clean, Windy Clean, Carpet Clean, Cool Clean, Strong Clean आणि Meteor Clean, हे अॅप्स आहेत ज्यापासून तुम्ही सावध राहायला हवे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.