-
ऋजुता लुकतुके
भारतात आणि जगभरात आता फोल्डिंग फोनचं फारसं नाविन्य उरलेलं नाही. सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल फोन नंतर मोटोरोला, विवो अशा सगळ्याच कंपन्यांनी आपापले फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. तरुणांनी ते पसंतही केले आहेत. अजून हे तंत्रज्जान तितकंसं विकसित नाही. म्हणजे जिथे फोन दुमडला जातो, तिथे अजिबात चित्र किंवा प्रतिमा अस्पष्ट न दिसणं, फोनचा डिस्प्ले तितकाच मजबूत असणं अशा गोष्टी कुठल्याच कंपनीला १०० टक्के जमलेल्या नाहीत. पण, तरीही फोल्डेबल फोनचं प्रस्थ वाढतच आहे. (Tecno Phantom V Fold 2 5G)
(हेही वाचा- Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!)
अशावेळी टेक्नो या तुलनेनं नवीन कंपनीने आपले दोन फोल्डेबल फोन जगभरात आणि भारतीय बाजारपेठेतही लाँच केले आहेत. विशेष म्हणजे मोटोरेझर हा फोल्डेबल फोन आणि टेक्नो फँटम हा फोन जवळ जवळ एकाच वेळी बाजारात आले आहेत. यापैकी टेक्नोचं वर्णन हे स्वस्तात मस्त असंच करावं लागेल. टेक्नो फँटम व्ही फोल्ड टू ५ जी असं एका फोनचं नाव आहे. (Tecno Phantom V Fold 2 5G)
७.८५ इंचांचा मोठा टचस्क्रीन, १०८० बाय २२०० पिक्सेलची प्रखरता आणि १२ जीबीची रॅम अशा तगड्या फिचरमध्ये हा फोन तुम्हाला मिळतो. फोनमध्ये असलेले तीनही कॅमेरे ५० मेगापिक्सेलचे आहेत. तर बॅटरीही ५,४०० एमएएच इतकी तगडी आहे. (Tecno Phantom V Fold 2 5G)
Two Aces, one vision – the next-gen Foldable Flagship PHANTOM V Fold2 and V Flip2 are here! Lightweight, AI-powered, and built for all-rounder performance to ace it all, just like @layzhang. Ready to flip the world with @layzhang? Let’s go: #StopAtNothing #TECNOxLayZhang pic.twitter.com/XyiCFMuSsP
— tecnomobile (@tecnomobile) September 13, 2024
शिवाय अँड्रॉईड १४ या अद्ययावत मोबाईल प्रणालीवर तो बेतलेला आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सोय आहे. तसंच ७० मेगावॅटच्या झटपट चार्ज करून देणारा चार्जरही फोनबरोबर उपलब्ध आहे. या फोनमधील स्टोरेजही ५१२ जीबी असं तगडं आहे. फोनमध्ये दोन सिमकार्ड ठेवण्याची सोय आहे. मात्र स्टोरेज वाढवलं जाऊ शकत नाही. (Tecno Phantom V Fold 2 5G)
(हेही वाचा- बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम)
हा फोन काळ्या, कार्स्ट हिरव्या आणि रिपलिंग निळ्या रंगात सध्या उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत ८९,९९० रुपयांपासून सुरू होते. मोटोरोला, विवो आणि सॅमसंग या कंपन्यांचे फोल्डेबल फोन या फोनचे स्पर्धक आहेत. पण, यात सगळ्यात कमी किमतीचा फोन उपलब्ध करून टेक्नोने या निकषावर बाजी मारली आहे. (Tecno Phantom V Fold 2 5G)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community