मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, इतके वाढणार दर

140

मोबाईल रिचार्जसह इंटरनेट रिचार्जही महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्ज आता सर्वसामान्यांचा खिसा कापणार असल्याचे बोलले जात आहे. देशभरात काही टेलिकॉम कंपन्या या 5G सुविधा देऊ लागल्यामुळे त्यासाठी येणा-या खर्चापाई मोबाईल रिचार्ज वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

20 टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता

5G लाँच केल्यामुळे तसेच त्याच्या रोलआऊटसाठी करण्यात आलेल्या निधीच्या तरतुदीमुळे कंपन्यांना अतिरिक्त आर्थिक गंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या आपल्या टेरिफ दरांत वाढ करू शकतात, अशी माहिती मिळत आहे. पोस्टपेड प्लॅन 20 टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचाः EWS आरक्षणासाठी कोण असणार पात्र? वाचा संपूर्ण निकष)

टेलिकॉम कंपन्यांनी दिले संकेत

वर्षभरापूर्वीच टेलिकॉम कंपन्यांकडून मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. सध्या टेलिकॉम कंपन्यांना लागणा-या अतिरिक्त निधीमुळे 15 ते 20 टक्क्यांपर्यंत मोबाईल रिचार्जमध्ये वाढ होऊ शकते. तसेच त्यासोबतच इंटरनेट रिचार्जही वाढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वोडाफोन-आयडियाच्या सीईओंनी देखील रिचार्जचे दर वाढवणार असल्याचे संकेत याआधी दिले आहेत. 2021 मध्येही मोबाईल रिचार्जच्या दरांत 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.