-
ऋजुता लुकतुके
जगातील सगळ्यात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री लपलेली नाही. मस्क निवडणुकीत मोहिमेत ट्रम्प यांच्या जवळ होते. आणि ते निवडून आल्यावर मस्क व्हाईट हाऊसमध्ये तळ ठोकून होते. टेस्ला गाड्यांवर अमेरिकेत काही ठिकाणी हल्ले झाल्यावर ट्रम्प यांनी हल्लेखोरांना दहशतवादी ठरवण्याची धमकी दिली होती. मस्क यांनीही आधुनिक टेस्ला गाड्यांचा ताफा व्हाईट हाऊसमध्ये दाखवण्यासाठी आणला होता. (Tesla Share Price)
पण, त्याचवेळी मागच्या एका महिन्यात म्हणजेच २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल २९ टक्क्यांची घसरण झाली आहे. अध्यक्षांबरोबरची दोस्ती कंपनीला मदत करणारी असायला हवी. तर इथे मस्क यांचं नुकसान होतंय. अलीकडेच मस्क यांनी ट्विटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. ‘दीर्घ काळात सगळं ठिक होईल,’ असा दिलासा गुंतवणूकदारांना देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. (Tesla Share Price)
(हेही वाचा – Jayant Patil शरद पवारांची साथ सोडणार?)
JUST IN: Elon Musk says Tesla “will be fine long-term” after $TSLA fell 15.4% today. pic.twitter.com/43ndQYltar
— Watcher.Guru (@WatcherGuru) March 10, 2025
शेअरमधील घसरणीमुळे आपलं १५,००० कोटीच्या वर भागभांडवल बुडाल्याचं मस्क म्हणाले होते. अशावेळी नेमकी टेस्ला कारमध्ये घसरण का होतेय ते समजून घेऊया. टेस्ला शेअरचा वार्षिक उच्चांक ४८८.५४ इतका आहे आणि सध्या हा शेअर त्याच्या निम्म्या म्हणजे २४९.९८ डॉलरपर्यंत घसरला आहे. यात १० मार्चच्या एका दिवसांत झालेली १५ टक्क्यांची घसरण आहे. तर अख्ख्या फेब्रुवारी महिन्यात टेस्लामध्ये २९ टक्क्यांची घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार बंद होताना शेअर काहीसा सावरला आणि ४ टक्क्यांनी वाढला आहे. (Tesla Share Price)
(हेही वाचा – MTNL Share Price : एमटीएनएलचा शेअर एका दिवसांत ५ टक्क्यांनी कसा वधारला?)
टेस्लाच्या घसरणीमागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. मस्क अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असले तरी ते राजकारणातच आपला बराचसा वेळ घालवत असल्याची लोकांची तक्रार आहे. त्यामुळे आपला उद्योग हाताळण्यात ते कमी पडतायत असा आरोपही त्यांच्यावर होतोय. याचा परिणाम शेअरच्या घसरणीवर झालाय. दुसरं म्हणजे मस्क यांची टेस्ला कार ही एकमेव कंपनी सध्या नफा कमावण्याच्या स्थितीत आहे. बाकी स्टारलिंक कंपनी, स्पेसेक्स आणि ट्विटर या कंपन्यांमध्ये मस्क यांचा वेळ आणि गुंतवणूक दोन्ही जास्त आहे. अशावेळी नफ्याचं कमी झालेलं प्रमाण टेस्लाच्या घसरणीला कारणीभूत आहे. शिवाय टेस्ला कंपनीची घसरलेली विक्री हे आणखी एक कारण यामागे आहे. मस्क यांना विरोध तसंच टेस्लाच्या महागड्या कारना देशविदेशातून कमी झालेली मागणी यामुळेही टेस्लाचे शेअर खाली आले आहेत. (Tesla Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community